घरगुती वीजजोडणी तोडल्यास शिवसेना आपल्या स्टाइल ने आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:10 IST2021-03-28T04:10:39+5:302021-03-28T04:10:39+5:30
मागच्या वर्षी सुरू झालेल्या कोरोना संकटाने देशासह भारतातही उद्रेक केला होता. संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये होता. त्यावेळी नागरिकांना एक वेळच्या ...

घरगुती वीजजोडणी तोडल्यास शिवसेना आपल्या स्टाइल ने आंदोलन करणार
मागच्या वर्षी सुरू झालेल्या कोरोना संकटाने देशासह भारतातही उद्रेक केला होता. संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये होता. त्यावेळी नागरिकांना एक वेळच्या जेवणासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागत होते. आता पुन्हा कोरोनाचे डोके वर काढले आहे. सगळीकडे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. सरकारतर्फे पुन्हा लॉकडाऊनचा इशारा देण्यात येत आहे. अश्यातच खडकी बीज वितरण कार्यालयातर्फे वीज तोडणी मोहीम सुरू करण्यात आली आहे, ही लज्जास्पद बाब आहे. तरी कृपया वीज वितरण अधिकाऱ्यांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन वीजजोड न तोडता नागरिकांना टप्प्याटप्प्याने वीजबिल भरण्यास मुभा द्यावी. अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येई. अशा आशयाचे निवेदन रवींद्र सोनवणे यांनी वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी एस गवारी यांना दिले याप्रसंगी शिवसेना प्रभाग प्रमुख , शिरीष दरेकर, शिवसैनिम मोहन गवळी, उत्तम रास्ते, अशोक शिरसाठ,महेश पुहाल, करण चव्हाण व शिवसैनिक उपस्थित होते.