शिवसेनेकडे जनतेचे प्रश्न सोडविण्याची धमक : महेश पसालकरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:40+5:302021-07-14T04:14:40+5:30
दौंड येथे शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभप्रसंगी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ...

शिवसेनेकडे जनतेचे प्रश्न सोडविण्याची धमक : महेश पसालकरा
दौंड येथे शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभप्रसंगी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनहिताचे घेतलेले निर्णय व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून जनतेच्या समस्या समजावून घेण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, २४ जुलैपर्यंत हे अभियान तालुक्यात राबाविण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला असल्याने दिवसेंदिवस तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढत चालली आहे, असे शेवटी महेश पासलकर म्हणाले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, शिवसेना दौंड शहरप्रमुख आनंद पळसे, दौंड तालुका महिला संघटक छाया जगताप, स्वाती ढमाले, प्रमोद रंधवे, चांद बादशाह शेख, नवनाथ जगताप, अजय कटारे, दुर्गा सोनोने, काका परदेशी, अभिजित डाळिंबे, अजित फुटाणे, हनुमंत निगडे, डॉ. यशवंत धावडे, संजय आटोळे, प्रसाद कदम,अक्षय घोलप,नितीन सलामपुरे, दीपक चीतारे, गणेश झोजे, दत्ता मधुरकर, दत्ता राऊत, विनायक सोनोने, चेतन लवांडे, नासिर शेख यांच्यासह ग्रामीण भागातील शिवसैनिक उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १३ दौंड शिवसेना
फोटोओळ : दौंड येथे शिवसंपर्क अभियानप्रसंगी बोलताना शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर.