शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याशी संबंध नसणाऱ्या कंपनीत शिवसेनेची नौटंकी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 20:52 IST

किंबहुना ज्या कंपन्या पिकविमा रक्कम अदा करणार आहेत, त्यामध्ये इफ्फको टोकिओ विमा कंपनीच नाही़..

ठळक मुद्देपीक विम्यासंबंधीचा करार हा शेतकरी व पीकविमा कंपनी यांच्यात झालेला असतो़.

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा कुठल्या विमा कंपनीकडून उतरविण्यात आला आहे, याची कुठलीही खातरजमा न करता, ज्यांनी पीक विमा उतरविलाच नाही अशा ‘इफ्फको टोकिओ विमा कंपनी’चे कार्यालय फोडून शिवसेनेने आज पुन्हा एकदा आपला शेतकऱ्याप्रतीचा जिव्हाळा दाखवित नौटंकी केली़.

राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडून ज्या विमा कंपनीकडे पिकविमा उतरविण्यात आला आहे. किंबहुना ज्या कंपन्या पिकविमा रक्कम अदा करणार आहेत, त्यामध्ये इफ्फको टोकिओ विमा कंपनीच नाही़ असे असतानाही या कंपनीचे कार्यालय फोडले गेल्याने विम्यासंबंधीचा किती अभ्यास करून शिवसेना शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले , असा प्रश्न उपस्थित होत आहे़.

कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामाकरिता राज्यात दोन विमा कंपन्यांकडून पिकविमा उतरविण्यात आला आहे़. यामध्ये हिंगोली, जालना व नागपूर जिल्ह्यातील पीकविमा हा ‘बजाज अलायन्स’ या विमा कंपनीकडून तर, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमधील पीक विमा हा ‘अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी’कडून उतरविण्यात आला आहे़. या खरीप हंगामात राज्यातून १ कोटी २७ लाख शेतकऱ्यांनी अर्ज करून पिकविमा उतरविला आहे़. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत इफ्फको टोकिओ कंपनीचा कुठेही संबंध नाही़. पीक विमा योजनेत ही कंपनी खरीप २०१८ हंगामात सहभागी झाली होती़ व त्यावेळीचा सर्व पिकविमा या कंपनीने शेतकऱ्यांचा अदा केला असून, या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्डही शासन दरबारी चांगले असल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले आहे़. ------------* अशा आंदोलनांनी ठेवले जाईल नियमांवर बोट

पीक विम्यासंबंधीचा करार हा शेतकरी व पीकविमा कंपनी यांच्यात झालेला असतो़. नैसर्गिक आपत्तीच्यावेळी अनेकदा विमा रक्कम अदा करताना लिखित नियमांच्या चौकटीबाहेर जाऊन रक्कम अदा करण्याची भूमिका घेण्यासाठी राज्य शासन कंपन्यांना शिफारस करीत असते़. परंतू, अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे या विमा कंपन्याही, विमा रक्कम अदा करताना नियमांवरच बोट ठेऊ शकणार आहेत़. परिणामी, यात शेतकऱ्यांचेच नुकसान होण्याची मोठी शक्यता आहे़. 

टॅग्स :PuneपुणेCrop Insuranceपीक विमाShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारी