शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Vikram Gokhale: बाळासाहेबांच्या आत्म्याला यातना होत असतील, भाजपा-सेनेनं एकत्र यायला हवं; विक्रम गोखलेंचं रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 15:31 IST

Vikram Gokhale on Shivsena BJP Alliance: विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्यावतीनं त्यांना सन्मान करण्यात आला. यावेळी गोखले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

पुणे-

शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी ज्या कारणासाठी केली, ज्यांच्यामुळे मराठी माणसाला आधार मिळाला आणि आज जे सुरू आहे ते पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पना आता जे बाहेर राहून फक्त बघतायत त्यांनाच येऊ शकते आणि त्यातला मी एक आहे, असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते. विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्यावतीनं त्यांना सन्मान करण्यात आला. यावेळी गोखले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

राज्यातील महाविकास आघाडीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेना-भाजप एकत्र यावेत म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. तुमचं तरी काय बिघडलं असतं. ती चूक झाली. ज्यांना फॉलोअर्स असतील त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या आघाडीसाठी पुढाकार घाययला हवा, मी घेतोय पुढाकार, असं विक्रम गोखले म्हणाले. 

उद्धव ठाकरे आणि फडणवीसांशी बोलणार"राज्यात जे सुरूय ते योग्य नाही. माझी सखी आत्तेसासू ही बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीची पहिली प्रमुख होती. बाळासाहेब हे माझे मामेसासरे होते. बाळासाहेबांची भाषणं ऐकून गेली ४० वर्ष महाराष्ट्र तृप्त झालेला आहे. त्यांच्या निधनानंतर राजकारणामध्ये जे खेळ सुरू आहेत. ते इतक्या विचित्र स्तरावर पोहोचले आहेत. ते पाहून खरंतर मराठी माणूस भरडला जातोय. प्रत्येकाचं हे म्हणणं आहे की सरकारचं हे गणित चुकलेलं आहे", असं विक्रम गोखले म्हणाले. 

"चुकलेलं गणित नीट करायचं असेल. तर अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या संकटाच्या कड्यावर आपला देश उभा आहे. त्यातून जर मागे खेचायचं असेल तर भाजपा आणि शिवसेनेनं एकत्र यायलाच पाहिजे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही", असंही ते म्हणाले. 

शिवसेना-भाजपाला एकत्र आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. फडणवीसांना मी स्वत: प्रश्न विचारलेले आहेत की अडीच वर्ष दिली असती तर तुमचं काय बिघडलं असतं किंवा शिवसेनेचं काय बिघडलं असतं? हे माझे प्रश्न मी त्यांना विचारलेले आहेत. मी स्वत: उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट घेऊन याबाबत नक्कीच बोलेन. कारण भाजपा-शिवसेना एकत्र यायलाच हवेत. तेच देशासाठी चांगलं आहे, असं ठाम मत विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं. 

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा