शिवसह्याद्री ट्रेकर्सने केली हरिश्चंद्रगडाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:32 IST2021-01-08T04:32:05+5:302021-01-08T04:32:05+5:30

शिवसह्याद्री ट्रेकर्स संस्थापक अध्यक्ष संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध उपक्रम राबवतात. यात प्रत्येक महिन्यातील एक दिवस छत्रपती ...

Shiv Sahyadri trekkers cleaned Harishchandragad | शिवसह्याद्री ट्रेकर्सने केली हरिश्चंद्रगडाची स्वच्छता

शिवसह्याद्री ट्रेकर्सने केली हरिश्चंद्रगडाची स्वच्छता

शिवसह्याद्री ट्रेकर्स संस्थापक अध्यक्ष संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध उपक्रम राबवतात. यात प्रत्येक महिन्यातील एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती जाऊन दुर्गभ्रमंती व स्वच्छता मोहीम राबवतात. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम राबवल्याचे पुणे जिल्हा बॅंकेचे अधिकारी जयेश गद्रे यांनी सांगीतले.

किल्ले हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी खिरेश्वरमार्गे पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात शिवसह्याद्री ग्रुपची किल्ले चढाई सुरू झाली. कडाक्याची थंडी असताना थोड्याच वेळात चालताना शिवगर्जनेमुळे थंडी नाहीशी झाली. किल्ल्यावरती दुपारी बारा वाजता ग्रुपतर्फे केदारेश्वर मंदिरात अभिषेक केला गेला व त्यानंतर किल्ल्यावर पुरंदरचा भगवा झेंडा फडकवला . हरिश्चंद्रगडावर प्रमुख आकर्षण असणारा कोकण कडा प्रत्येक गिरिदुर्ग भ्रमंती करणा-यांनी हरिश्चंद्रगड भेट द्यावी, असा हा किल्ला आहे. शिवसह्याद्री ट्रेकर्सच्या सदस्यांनी किल्ल्यावर स्वच्छता केली व काही ठिकाणी मोडकळीस आलेल्या पाय-यांची डागडुजी करण्यात आली.

यावेळी संस्थापक अध्यक्ष संतोष यादव, जिल्हा बॅंकेचे जयेश गद्रे, नितीन यादव, अक्षय यादव, निजाम शेख, शुभम जाधव, शेखर शेंडगे, नितीन इंदलकर, प्रतीक इंदलकर, तन्मय बहिरट उपस्थित होते.

०७ भुलेश्वर

हरिश्चंद्रगडाची स्वच्छता करताना शिवसह्याद्री ट्रेकर्सचे सदस्य.

Web Title: Shiv Sahyadri trekkers cleaned Harishchandragad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.