येरवड्यात विधायक उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:31 IST2021-02-20T04:31:31+5:302021-02-20T04:31:31+5:30
संकल्प युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती व पाचव्या वर्धापनदिनानिमित्त सफाई कर्मचा-यांचा सन्मान व रक्तदान शिबिराचे आयोजन ...

येरवड्यात विधायक उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात
संकल्प युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती व पाचव्या वर्धापनदिनानिमित्त सफाई कर्मचा-यांचा सन्मान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशाखा गायकवाड, शैलेश राजगुरू, मनोज शेट्टी , राहुल जाधव, राम बांगड, राहुल हजारे, मनोज ठोकळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक आकाश पंडित, सौरव गवळी यांनी केले होते.
हरीगंगा सोसायटी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोसायटीच्या आवारात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही व सुरक्षा यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रतापगड उत्सव समितीचे संजय भोसले, मंगेश गोळे उपस्थित होते. सोसायटीचे अध्यक्ष शेखर बोंगीर, सचिव कपिल पांडे, संचालक विजय फाळके यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन व आभार संजय पोळ यांनी केले.