वारूळवाडी ग्रामपंचायतीकडून शिवभोजन थाळी सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:07 IST2021-04-29T04:07:40+5:302021-04-29T04:07:40+5:30

शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात करण्यात आला. या वेळी सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, उद्योजक संजय ...

Shiv Bhojan Thali started from Warulwadi Gram Panchayat | वारूळवाडी ग्रामपंचायतीकडून शिवभोजन थाळी सुरुवात

वारूळवाडी ग्रामपंचायतीकडून शिवभोजन थाळी सुरुवात

शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात करण्यात आला. या वेळी सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, उद्योजक संजय वारुळे, ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच देवेंद्र बनकर, आत्माराम संते, विपुल फुलसुंदर, माजी उपसरपंच सचिन वारुळे, सदस्य विनायक भुजबळ, ज्योती संते, स्नेहल कांकरिया, रेखा फुलसुंदर, राजश्री काळे, बाबू डोंगरे, विकास फुलसुंदर आदी उपस्थित होते.

सरपंच राजेंद्र मेहेर म्हणाले की, राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायत वारूळवाडी येथे शिवभोजन योजना मागील वर्षांपासून सुरू आहे. यंदाच्या वर्षी पुन्हा ही योजना मोफत सुरू केली आहे. पहिल्या दिवशी ११३ लाभार्थीना लाभ देण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ प्रातिधिनिक स्वरूपात ३५ लाभार्थींना देऊन करण्यात आला. उर्वरित नागरिकांना प्रभागनिहाय वाटप केले जाणार आहे.

--

फोटो क्रमांक : २८नारायणगाव वारुळवाडी शिवभोजन थाळी

फोटो ओळ - ग्रामपंचायत वारूळवाडी येथे मोफत शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ करताना सरपंच राजेंद्र मेहेर व उपसरपंच माया डोंगरे.

Web Title: Shiv Bhojan Thali started from Warulwadi Gram Panchayat