शिष्यवृत्ती परीषेत शिरूर तालुक्याची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST2020-11-28T04:04:26+5:302020-11-28T04:04:26+5:30
मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीचे ५४५तर, आठवीचे ३६ विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी पाचवीचे ५६७ विद्यार्थी पात्र ठरले असून ...

शिष्यवृत्ती परीषेत शिरूर तालुक्याची बाजी
मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीचे ५४५तर, आठवीचे ३६ विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी पाचवीचे ५६७ विद्यार्थी पात्र ठरले असून आठवीचे ५८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बारामती, भोर, हवेली, इंदापूर, जुन्नर आणि पुरंदर या सहा तालुक्यांतील एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकला नाही. आठवीत सर्वाधिक २० विद्यार्थी शिरूर तालुक्यातील पात्र ठरले आहेत. याशिवाय खेड व मुळशी तालुक्यातील प्रत्येकी १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आहेत. मावळमधील पाच, आंबेगाव आणि वेल्हे प्रत्येकी दोन तर, दौंड तालुक्यातील एक विद्यार्थी गुणवत्तायादीत आला आहे. तर पाचवीच्या वर्गातील मावळ तालुक्यातील एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही. दरम्यान, शिवतरे म्हणाले, जिल्हा परिषदेची आठवीचे वर्गाची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे या वर्गातील कमी विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसत असतात.
चौकट
तालुकानिहाय पाचवी वर्गातील विद्यार्थी
आंबेगाव ८६, बारामती ३, भोर ९, दौंड ९, हवेली २३, इंदापूर ५, जुन्नर १७, खेड ११८, मुळशी ९, पुरंदर ११, शिरूर २७६, वेल्हा १.