शिरुरमध्ये ४५ उमेदवारांचे अर्ज बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:13 IST2021-01-03T04:13:09+5:302021-01-03T04:13:09+5:30

शिरुर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकी साठी एकूण २६६७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्जाची आज ...

In Shirur, applications of 45 candidates were rejected | शिरुरमध्ये ४५ उमेदवारांचे अर्ज बाद

शिरुरमध्ये ४५ उमेदवारांचे अर्ज बाद

शिरुर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकी साठी एकूण २६६७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्जाची आज छानणी करण्यात आली त्यात ४५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. २६२२ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तालुक्यातील निमगाव दुडे ,रावडेवाडी, आमदाबाद, चांडोह, फाकटे, वडनेर खुर्द ,नागरगाव ,आंधळगाव, पिंपळसुटी ,कुरूळी ,गणेगाव दुमाला ,बाभुळसर बुद्रुक, सादलगाव ,कोळगाव डोळस ,निर्वी, चिंचणी, गुनाट, शींदोडी, चिंचोली मोराची, वरुडे, निमगाव भोगी, दहिवडी, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द , मुखई ,भांबर्डे ,गणेगाव खालसा ,बुरुंजवाडी ,बाभूळ सर खुर्द मोटेवाडी, गोलेगाव ,करंदी, आपटी, पिंपळे जगताप ,डिंग्रजवाडी, खैरेनगर, खैरेवाडी, मिडगुलवाडी, पिंपळे खालसा, हिवरे ,कांहुर मेसाई ,केंदुर ,पाबळ ,धामारी ,पिंपरखेड, वडगाव रासाई, इनामगाव, शिरसगाव काटा, न्हावरे, आलेगाव पागा ,उरळगाव, सविंदणे, मलठण, कवठे येमाई , निमगाव म्हाळुंगी, विठ्ठल वाडी, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, पारोडी ,टाकळी भिमा, खंडाळे, वाघाळे, पिंपरी दुमाला, कोंढापुरी, निमोणे ,कारेगाव, वढू बुद्रुक, सणसवाडी, कोरेगाव भीम, दरेकरवाडी, वाडा पुनर्वसन,या ग्रामपंचायती साठी निवडणूक होत असल्याचे तहसिलदार लैला शेख यानी सांगितले.

Web Title: In Shirur, applications of 45 candidates were rejected