शिरूरला सर्वच पक्ष विकास आघाडीसोबत!
By Admin | Updated: November 14, 2016 02:12 IST2016-11-14T02:12:24+5:302016-11-14T02:12:24+5:30
शिरूर व तळेगाव-दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी स्थानिक आघाडीसोबत जाणार असून, इतर नगर परिषदांमध्ये स्वबळावर लढणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी

शिरूरला सर्वच पक्ष विकास आघाडीसोबत!
शिरूर : शिरूर व तळेगाव-दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी स्थानिक आघाडीसोबत जाणार असून, इतर नगर परिषदांमध्ये स्वबळावर लढणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल्यानंतर भाजपसह काँग्रेस, शिवसेनेनी आंम्ही शिरूरला आघाडीसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आघाडी कोणासोबत राहणार याबाबत उत्सुकता लागली असून शहराच्या विकासाच्या राजकारणासाठी सर्व सहमतीचे राजकारण आंम्ही करीत असून जे येतील त्यांना आंम्ही सामावून घेवू अशी भुमिका विकास आघाडीने घेतली आहे.
शिरूर शहरात रसिकलाल व प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली चांगला विकास झाला आहे. यामुळे आम्ही धारिवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे दोन दिवसांपूर्वी अजीत पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शहर काँग्रेसनेही या आघाडीसमवेत जाण्याचा निर्णय जाहीर केला.
शिवसेनेनेही आपली भुमिका आघाडीसोबतच जाण्याची असल्याचे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर भाजप काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र जिल्ह्यातील तीन ते चार नगर
परिषदेचे भाजपाने स्थानिक आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून, शिरूर नगर
परिषदेच्या निवडणुकीसाठीही स्थानिक शिरूर शहर विकास आघाडीसोबत जाण्याची घघेषणा आमदार बाबूराव पाचर्णे यांनी रविवारी सायंकाळी जाहिर केली. ते भाजपाचे विधानपरिषदेचे उमेदवार आशोक ऐनापूरे यांच्या प्रचारासाठी आले असता, त्यांनी स्पष्ट केले.
आमदार पाचर्णे यांनी मागील वर्षभरात अनेक कार्यक्रमांत प्रकाश धारिवाल यांची जाहीर स्तुती करून या वेळी त्यांच्या विरोधात न जाण्याचे संकेत दिले होते. यामुळे ते धारिवालांच्या नेतृत्वाखालील आघाडीसोबत निवडणूक लढवतील, अशी अनेक दिवसांपासून शहरात चर्चा आहे. यासंदर्भात या दोघांबाबत अनेकदा चर्चाही झाली आहे.
मात्र, पाचर्णे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. त्यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, की पक्षाची (भाजपा)
स्वबळावर लढण्याचीच मनीषा होती. मात्र, जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी पक्षाने स्थानिक आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने शिरूरमध्येही स्थानिक शहर विकास आघाडीसोबत जाण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले. (वार्ताहर)