शिरसाट स्पोर्ट्सने पटकाविला 'क्रिकऑन' करंडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:10 IST2021-04-04T04:10:37+5:302021-04-04T04:10:37+5:30

आळंदी : पालघर (मुंबई) येथे टेनिस क्रिकेट डॉट इनच्या वतीने आयोजित केलेल्या 'क्रिकऑन' फुल पीच टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम ...

Shirsat Sports wins 'Cricon' trophy | शिरसाट स्पोर्ट्सने पटकाविला 'क्रिकऑन' करंडक

शिरसाट स्पोर्ट्सने पटकाविला 'क्रिकऑन' करंडक

आळंदी : पालघर (मुंबई) येथे टेनिस क्रिकेट डॉट इनच्या वतीने आयोजित केलेल्या 'क्रिकऑन' फुल पीच टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अमोल शिरसाट यांच्या मालकीच्या शिरसाट स्पोर्ट्स, पुणे - अहमदनगर संघाने पिरॅमिटर गुजरात संघाचा नऊ विकेट राखून पराभव करत प्रथम क्रमांक संपादन केला. विजेत्या संघाला रोख ५ लाख रुपये व मानाचा क्रिकऑन कप देण्यात आला.

संपूर्ण स्पर्धेत बहारदार फलंदाजी करणाऱ्या एजाज कुरेशीला 'मालिकावीर', तर अंतिम सामन्यात कृष्णा सातपुतेला 'सामनावीर' किताबाने गौरविण्यात आले.

स्पर्धेत देशातील नामवंत बारा संघांना सहभागी करून घेण्यात आले होते. विशेष म्हणजे, स्पर्धेला आंतरराष्ट्रीय लूक देण्यात आला होता. विजेत्या प्रथम तीन संघांना खासदार राजेंद्र गावित, आमदार संजय पोतनीस, बाबा रोड्रिंक्स, रणजी खेळाडू साईराज पाटील, एअर इंडिया इंजिनिअर अमोल शिरसाट यांच्या हस्ते अनुक्रमे पाच, तीन व दोन लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेत पंच म्हणून सतीश कुरूप, शशी साटम, कल्याण घोरपडे तर चंद्रकांत शेटे, कुणाल दाते, हरीश पंड्या, सिद्धीक भावे, रेश्मा मयेकर यांनी समालोचन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संतोष नाणेकर, चंद्रकांत शिंदे, करुणा कोटीयन यांचे विशेष सहकार्य लाभले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

प्रथम क्रमांक : शिरसाट स्पोर्ट्स, पुणे - अहमदनगर.

द्वितीय क्रमांक : पिरॅमिटर, गुजरात.

तृतीय क्रमांक : राजमुद्रा ग्रुप, विक्रोलीयन्स

०३आळंदी

पालघर येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेले शिरसाट स्पोर्ट्स संघाचे खेळाडू.

Web Title: Shirsat Sports wins 'Cricon' trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.