शिरोलीत बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला
By Admin | Updated: July 7, 2016 03:27 IST2016-07-07T03:27:54+5:302016-07-07T03:27:54+5:30
शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील शेतकरी विठ्ठल चिमाजी थोरवे यांच्या शेतात बुधवारी सायंकाळी बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला. जुन्नर तालुक्यात आतापर्यंत ८ ते ९

शिरोलीत बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला
खोडद : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील शेतकरी विठ्ठल चिमाजी थोरवे यांच्या शेतात बुधवारी सायंकाळी बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला. जुन्नर तालुक्यात आतापर्यंत ८ ते ९ बिबटे मृतावस्थेत आढळले आहेत.
थोरवे यांच्या टोमॅटोच्या बागेत हा मृतावस्थेतील मादी जातीचा बछडा आढळला. आज सायंकाळी ६ वाजता याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाच्या वनरक्षक मनीषा काळे यांना याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक मनीषा काळे, बिबट बचाव दलाचे विकास मोरे व धोंडिभाऊ मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. बछड्याचे वय दीड वर्ष असून मृत्यूचे कारण समजू शकले नाही. मृत बछड्याला हिवरे येथील गिप्सन स्मारक विश्रामगृहात ठेवण्यात आले असून उद्या गुरुवारी (दि. ७) शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे मनीषा काळे यांनी सांगितले. (वार्ताहर)