Shirish More ( Marathi News ) : संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष महाराज यांनी आज राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येने राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी रात्री शिरीष मोरे जेवणानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. पण, सकाळी उशीर होऊनही ते खोलीतून बाहेर आले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला. पण, आतून काही प्रतिसाद आला नाही. यामुळे कुटुंबीयांनी दरवाजा तोडला. यावेळी कुटुंबीयांना शिरीज महाराज यांनी गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेचा तपास देहूरोड पोलीस करत आहेत. शिरीष महाराज यांच्या जवळ एक सुसाईड नोट सापडल्याची माहिती समोर आली आहे.
शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज आहेत. ते उदरनिर्वाहसाठी प्रवचन आणि कीर्तन करत होते. त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह होते. मात्र, यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. शिरीष महाराज मोरे हे फक्त ३० वर्षाचे होते. एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. याआधीच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे कळत आहे. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत. आज दुपारी चार वाजता अंत्यस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. मात्र, यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. येत्या 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह पार पडणार होता. मात्र, हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. सुसाईड नोटमध्ये आर्थिक परिस्थितीचे कारण दिल्याचे सांगण्यात येत आहे.