शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: शायनिंग मारणे पडले महागात, पिस्तुलातून गोळी उडून तरुण जखमी

By विवेक भुसे | Updated: September 9, 2023 15:38 IST

या घटनेत अभय छबन वाईकर (वय २२, रा. सांगरुण, ता. हवेली) हा जखमी झाला असून त्याच्यावर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे...

पुणे : भाईगिरी करण्यासाठी त्याने बेकायदेशीरपणे गावठी पिस्तुल मिळवले. मित्रावर रुबाब दाखविण्यासाठी त्याला ते दाखविणे, मात्र चांगलेच महागात पडले. मित्र पिस्तुल पहात असताना अचानक चाप ओढला गेल्याने गोळी सुटून ती तरुणाच्या मानेत शिरली. या घटनेत अभय छबन वाईकर (वय २२, रा. सांगरुण, ता. हवेली) हा जखमी झाला असून त्याच्यावर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.

याबाबत पोलीस हवालदार आनंद रोहिदास घोलप यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जखमी अभय वाईकर व अविष्कार ऊर्फ मोन्या तुकाराम धनवडे (वय १९, रा. सांगरुण, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, अभय वाईकर व अविष्कार धनवडे हे दोघेही काही काम धंदा करत नाही. सांगरुण गावातील गणपती मंदिरात बुधवारी रात्री दहा वाजता ते जमले होते. अभय वाईकर याने एक गावठी पिस्तुल मिळविले. ते त्याने अविष्कार याला दाखवत त्यांच्यावर शायनिंग मारण्याचा प्रयत्न केला. अविष्कार याने ते पिस्तुल त्याच्याकडून घेऊन पहात असताना अचानक त्याच्याकडून पिस्तुलाचा चाप ओढला गेला व गोळी सुटून ती अभय याच्या मानेत घुसली. त्याला तातडीने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने त्याचा जीव वाचला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड