शिंदेवाडीत महामार्ग पुन्हा पाण्यात

By Admin | Updated: September 17, 2015 02:37 IST2015-09-17T02:37:57+5:302015-09-17T02:37:57+5:30

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वेळू, शिंदेवाडी, ससेवाडी परिसरात मुसळधार पाऊस झाला. गोगलवाडीजवळच्या मोरीचे काम अपूर्ण असल्याने महामार्गावर पाणी साचले. नवीन बोगद्याजवळ

Shindevwadi highway again in water | शिंदेवाडीत महामार्ग पुन्हा पाण्यात

शिंदेवाडीत महामार्ग पुन्हा पाण्यात

भोर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वेळू, शिंदेवाडी, ससेवाडी परिसरात मुसळधार पाऊस झाला. गोगलवाडीजवळच्या मोरीचे काम अपूर्ण असल्याने महामार्गावर पाणी साचले. नवीन बोगद्याजवळ दरड कोसळल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली.
वेळू येथील दवाखाना पाण्यात गेला, तर अनेक बंधारे फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. ३ तासांत ९० ते १०० मिलिमीटर पाऊस पडल्याचा अंदाज आहे. या पावसाने दोन वर्षांपूर्वी शिंदेवाडी येथे पावसाने झालेल्या दुर्घटनेची आठवण ताजी झाली.
अर्धवट कामांमुळे महामार्गाची दुरवस्था झाली असून, थोडा अधिक पाऊस झाला, की महामार्ग बंद पडून वाहतूक विस्कळीत होत आहे. असे असले तरी महामार्ग प्राधिकरणाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
वेळू, शिंदेवाडी, ससेवाडी, गोगलवाडी परिसरात आज दुपारी ३.३० वाजता वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे ३ तासांनंतर साडेसहा वाजता पावसाने विश्रांती घेतली. वेळू गावाजवळील डब्लू.एम.कंपनी, शिंदेवाडी पोलीस चौकी समोर महामार्र्ग पाण्यात गेला.वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने व कात्रज नवीन बोगद्याजवळ दरड कोसळल्याने सुमारे ३ तास वाहातूक धिम्या गतीने सुरू होती. यामुळे वाहनचालक व प्रवासी त्रस्त झाले होते.
शिंदेवाडी फाट्याजवळ नवीन उड्डाणपुलाजवळचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे, तर पुलाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या तीन डोंगरांतून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी येते.
या पाण्यामुळे दरड कोसळली असून, याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी पाण्यात वाहून जाऊन मायालेकींचा मुत्यू झाला होता; मात्र त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. पावसामुळे पाणी साचून पुन्हा एखादा मोठा अपघात होऊ शकतो.
त्यानंतरच महामार्ग प्राधिकरणाला जाग येणार का, असा प्रश्न नागरिक, प्रवासी उपस्थित करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Shindevwadi highway again in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.