शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
2
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
3
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
4
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
5
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
6
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
7
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
8
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
9
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
10
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
11
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
12
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
13
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
14
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
15
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
16
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
17
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
18
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
19
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
20
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका

शिंदेसेनेचे ‘मिशन पुणे’ थंड, विधानपरिषदेचा ‘शब्द’ हवा

By राजू इनामदार | Updated: February 14, 2025 16:34 IST

भेटीगाठीही थंडावल्या: माजी नगरसेवकांची भाजपला पसंती

पुणे : राज्यात सगळीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे मिशन टायगर जोरात सुरू असले तरी पुणे शहरात मात्र त्याला ब्रेक लागला आहे. काही माजी आमदारांना थेट शिंदेंकडून विधानपरिषदेचा ‘शब्द’ हवा असल्याची चर्चा आहे. तो मिळत नसल्यानेच सगळे प्रवेश लांबणीवर पडले असल्याचे दिसते आहे. यासाठीच होणाऱ्या भेटीगाठीही थंडावल्या आहेत.दुसरीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातून अलीकडेच ५ माजी नगरसेवक बाहेर पडले, मात्र त्यांनी शिंदेसेनेचा दरवाजा वाजवण्याऐवजी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे पसंत केले. प्रादेशिकपेक्षा राष्ट्रीय पक्ष चांगला असे त्यांचे त्यावेळचे वक्तव्य होते व त्याचबरोबर खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच असेही त्यांनी शिंदेसेनेला डिवचले होते. त्यावरून बराच गदारोळ झाल्यावर मात्र त्यांनी त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली व शिंदेसेनेबरोबर मनोमीलन असल्याचे जाहीर केले. मात्र ते शिंदेसेनेत आले नाहीत व भाजपमध्ये गेले हे वास्तव कायम राहिले. उद्धव सेनेच्या राहिलेल्या नगरसेवकांपैकीही काहीजण भाजपतच जाणार असल्याची चर्चा आहे.त्यानंतर शिंदेसेनेतील पुण्यातील प्रवेश जवळपास थांबल्यातच जमा आहेत. माजी शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे यांच्याबरोबरच काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचीही नावे ते शिंदेसेनेत जाणार म्हणून घेतली जात होती. मात्र यातील धंगेकर यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांकडे यात काहीही तथ्य नाही असे स्पष्ट केले, तर मोकाटे व बाबर यांनी यावर काहीच जाहीर भाष्य केलेले नाही, त्याचबरोबर त्यांनी शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांबरोबर होणाऱ्या भेटीही थांबवल्या आहेत. महादेव बाबर यांनी विधानसभा निवडणुकीत उघडपणे पक्षाच्या ( उद्धव सेना) उमेदवाराच्या विरोधात काम केले होते. ज्या आमदारांना प्रवेश करायचा आहे, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे विधानपरिषदेचा शब्द मागितला असल्याचे समजते.भाजपत प्रवेश करणाऱ्यांची गर्दी वाढत चालली आहे व शिंदेसेनेकडे मात्र कोणीही नाही यावरूनच त्यांचे मिशन पुणे थंड झाले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. काँग्रेसचे काही नगरसेवक पक्ष सोडणार अशी मध्यंतरी चर्चा होती, मात्र तेही भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. तिथूनही शिंदेसेनेत यायला कोणीच इच्छुक नसल्याचे दिसते आहे. राज्याच्या राजकारणात सध्या महायुतीमध्ये शिंदेसेनेला दुय्यम महत्व दिले जात असल्याचा हा परिणाम असल्याचे मत स्थानिक राजकारणातील काही ज्येष्ठांनी व्यक्त केले.

मिशन पुणे यशस्वी होणारचउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा आता लोकनाथ अशी झाली आहे. प्रवेश होणार आहेत, त्यात उद्धवसेनेबरोबरच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यातील काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. माजी आमदारांच्या प्रवेशाची चर्चा वरिष्ठ स्तरावरून सुरू आहे. दिल्लीतील साहित्य संमेलनात शिंदे यांच्या हस्ते काही कार्यक्रम होणार असल्याने त्यानंतर म्हणजे फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात पुण्यात निश्चितपणे प्रवेश होतील.नाना भानगिरे- शहरप्रमुख शिवसेना (एकनाथ शिंदे) 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEknath Shindeएकनाथ शिंदे