शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सातबार्‍यावर नाव लावण्यासाठी लाच मागणारा शिक्रापूरचा तलाठी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 21:38 IST

खासगी व्यक्तीसह दोघांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

ठळक मुद्दे२५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे

पुणे: विकत घेतलेल्या जमिनीवरील सातबार्‍यावर नाव लावण्यासाठी २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्रापूर तलाठ्यासह एका खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

सजा शिक्रापूर तलाठी अविनाश केवलसिंग जाधव (वय ३२) आणि पंडीत उमाजी जाधव (वय २९) अशी दोघांची नावे आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार यांचे पत्नीच्या नावे शिक्रापूर येथे एक गुंठा जागा विकत घेतली आहे. या जागेची नोंद सातबारा उतार्‍यावर घेण्यासाठी तलाठी अविनाश जाधव याने ३० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर त्याची ४, ७, २१ जानेवारी आणि ८ फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तलाठी जाधव याने तडजोडीअंती २५ हजार रुपयांची मागणी करुन ती रक्कम खासगी व्यक्ती पंडित जाधव याच्याकडे देण्यास सांगितले. जाधव याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. परंतु, प्रत्यक्ष लाच घेण्यात आली नाही. मात्र, लाचेची मागणी करण्यात आली असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. पोलीस निरीक्षक अलका सरग अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक