शिक्रापूर : बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असताना, पोलिस दलानेही आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यातील ३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नुकतेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे. असे प्रशिक्षण घेणारे शिक्रापूर पोलिस ठाणे हे पुणे जिल्ह्यातील पहिले ठाणे ठरले असून, यामुळे पोलिसांचा दैनंदिन कामकाजाचा ५० टक्के वेळ वाचू लागला आहे.
वाढता गुन्हेगारी दर, एफआयआर लेखन, न्यायालयीन प्रक्रिया आणि बंदोबस्त यामध्ये पोलिस अधिकारी सतत व्यस्त असतात. ही गुंतागुंत सोडवण्यासाठी पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सध्या आमचा ५० टक्के वेळ वाचत असून, महिनाभरात प्रशासकीय कामाचा सुमारे ९० टक्के वेळ वाचवण्यापर्यंत आम्ही मजल मारू, असा विश्वास दीपरतन गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
१७ प्रगत एआय टूल्सचे मोफत प्रशिक्षण एएसएन कॉम्प्युटर एज्युकेशन सुधीर मुळे आणि सानिका कराळे यांनी दिले. यामध्ये खालील महत्त्वाच्या साधनांचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. संवाद आणि लेखन, विश्लेषण आणि तांत्रिक मदत, भाषांतर आणि सर्च, क्रिएटिव्ह टूल्स फोटो व व्हिडीओ एडिटिंग या टूल्सच्या मदतीने अहवाल लेखन, गुंतागुंतीच्या माहितीचे विश्लेषण आणि डिजिटल कंटेंट निर्मिती आता अधिक अचूक आणि जलद होणार आहे. यामुळे पोलिस ठाण्यातील अत्यंत महत्त्वाच्या कामांमध्ये ‘एआय’चा मोठा आधार मिळत असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
एफआयआर आणि एनसी तक्रारींचे मसुदे तयार करणे सोपे झाले आहे. स्टेशन डायरी रोजच्या घडामोडींची नोंद जलद गतीने करणे शक्य झाले. न्यायालयात सादर करावयाची दोषारोपपत्रे तयार करताना तांत्रिक विश्लेषण सोपे झाले आहे. बंदोबस्त नियोजन व्हीआयपी आणि रात्रीच्या बंदोबस्ताचे नियोजन चोखपणे करता येते असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
Web Summary : Shikrapur Police Station becomes Pune district's first AI-trained station. Thirty-five officers completed training, boosting efficiency by 50%. AI tools aid in report writing, analysis, and digital content creation, streamlining FIRs, station diaries, and court documents, saving time.
Web Summary : शिक्रापूर पुलिस स्टेशन पुणे जिले का पहला एआई-प्रशिक्षित स्टेशन बना। पैंतीस अधिकारियों ने प्रशिक्षण पूरा किया, जिससे दक्षता में 50% की वृद्धि हुई। एआई उपकरण रिपोर्ट लेखन, विश्लेषण और डिजिटल सामग्री निर्माण में सहायता करते हैं, जिससे प्राथमिकी, स्टेशन डायरी और अदालती दस्तावेजों को सुव्यवस्थित किया जा सकता है, और समय की बचत होती है।