शि. प्र. मंडळीकडून रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST2021-04-25T04:09:48+5:302021-04-25T04:09:48+5:30

पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ससून रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासाठी अभिनेते राहुल सोलापूरकर,अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री गायत्री ...

Shi. Q. Blood donation camp from the congregation | शि. प्र. मंडळीकडून रक्तदान शिबिर

शि. प्र. मंडळीकडून रक्तदान शिबिर

पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ससून रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासाठी अभिनेते राहुल सोलापूरकर,अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री गायत्री दातार, अभिनेते अजय पुरकर, फर्जंद चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर व आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहन मोरे या माजी विद्यार्थ्यांनी आवाहन केले होते. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिबिरासाठी सुमारे ४१५ रक्तदात्यांनी नोंदणी केली.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन शि. प्र. मंडळीचे नियामक मंडळ सदस्य मिहीर प्रभुदेसाई यांच्या हस्ते झाले. स. प. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. सविता दातार,नू. म. वि. शाळेच्या प्राचार्य प्राची गुमास्ते व एस. पी. एम. शाळेच्या मुख्याध्यापक डॉ. अपर्णा मॉरिस यांनी विशेष मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त भाग घेतला.

ले. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. रणजित चामले, राष्ट्रीय सेवा योजनेचे सुशील ठिगळे तसेच अभिजित चव्हाण, राजाभाऊ ढोण, दीपराज सांखला, हनुमंत ठोंबरे, नितीन राख यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Shi. Q. Blood donation camp from the congregation