शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टी खून प्रकरणात स्थानिक पोलिसांनी अटक केलेले आरोपीच खरे आरोपी : भाऊसाहेब आंधळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 19:12 IST

माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणात सीबीआयच्या अधिका-याने आम्हाला राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न केला. तसेच चुकीच्या मार्गदर्शनामुळे सीबीआयच्या तपासाची दिशा बदलल्याचा आरोप निवृत्त पोलीस निरीक्षक व गुन्हयातील आरोपी भाऊसाहेब आंधळकर यांनी केला.

ठळक मुद्देमाहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरण नवीन पुरावे मिळत नसल्याचे सांगत सीबीआयचा याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणात सीबीआयच्या अधिका-याने आम्हाला राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न केला. तसेच चुकीच्या मार्गदर्शनामुळे सीबीआयच्या तपासाची दिशा बदलल्याचा आरोप निवृत्त पोलीस निरीक्षक व गुन्हयातील आरोपी भाऊसाहेब आंधळकर यांनी केला. तसेच आम्ही अटक केलेले आरोपीच खरे आरोपी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.       नवीन पुरावे मिळत नसल्याचे सांगत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) याप्रकरणी नुकताच क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये मला व सहायक निरीक्षक नामदेव कवठाळे यांना क्लीन चीट मिळाल्याचे आंधळकर यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. खून होण्याच्या आठ दिवसपुर्वी सतीश शेट्टी यांनी गुंड विजय दाभाडे आणि त्याची पत्नी रुपाली यांना तडीपार करण्याची मागणी पोलीस अधिक्षकांकडे केली होती. तसचे ते चार महिने विजय व रुपाली दाभाडे यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेत होते. त्यामुळे त्यांच्यातील वाद संपला नसल्याचे स्पष्ट होते. मात्र असे असतानाही संदीप शेट्टी यांनी विजय दाभाडे आणि सतीश शेट्टी यांच्यातील वैमनस्य एक वषार्पुर्वीच संपल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल केले होते. त्याअनुशंगाने सीबीआयने तपास केला. तसेच प्रतिनियुक्ती केलेले अंजीर जाधव यांनी पॉलीग्राफ टेस्ट कायद्याने ग्राह्य नसतानही एका अधिका-याची घरी ती टेस्ट केली. तसेच त्यांनी तपासासाठी दिल्लीवरून आलेल्या टिमला शनिशिंगणापूर व शिर्डीला नेले, असा आरोप आंधळकर यांनी केला. स्थानिक हितसंबंधामुळे राज्यातील पोलीस अधिका-याची प्रतिनियुक्ती घेवू नये, असा नियम आहे. मात्र, तरीही जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबाबत उच्चन्यायालयात रीट पिटीशन दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेले चार्जशीट पेंडींग खून करणारा आणि खूनाचा कट रचनारे सापडत नाही म्हणून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नुकताच क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी विजय दाभाडे, प्रमोद दत्तात्रय वाघमारे, नवनाथ मारुती शेलार, हनुमंत डोंगरे आणि शाम दाभाडे यांच्या विरुद्ध पुराव्यासह दाखल केलेले दोषारोपपत्र अद्याप पुणे सत्र न्यायालयात पेंडींग आहे. सीबीआयच्या अधिका-याने आम्हाला राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझ्या व कवडाळे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रातून आम्हाला डिस्चार्ज करावे, यासाठी अर्ज केला असून तो सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.   

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस