शीतल शिंदे यांचा ‘विधी’चा राजीनामा

By Admin | Updated: March 30, 2017 02:28 IST2017-03-30T02:28:50+5:302017-03-30T02:28:50+5:30

येथील भाजपाचे नगरसेवक शीतल शिंदे यांना विधी समिती सदस्यपद जाहीर केले. मात्र सध्या कोणतेही पद नको

Sheetal Shinde's 'Riddhi' resigns | शीतल शिंदे यांचा ‘विधी’चा राजीनामा

शीतल शिंदे यांचा ‘विधी’चा राजीनामा

चिंचवड : येथील भाजपाचे नगरसेवक शीतल शिंदे यांना विधी समिती सदस्यपद जाहीर केले. मात्र सध्या कोणतेही पद नको असे म्हणत त्यांनी पदाचा राजीनामा गटनेते एकनाथ पवार यांच्याकडे सुपूर्त केला. या प्रकारामुळे राजकीय वतुर्ळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
शहरात गत निवडणुकीत भाजपाचे फक्त तीन नगरसदस्य निवडून आले होते. त्यांमध्ये चिंचवडमधून शिंदे यांनी विजय मिळविला होता.यंदाच्या निवडणुकीत शिंदे पुन्हा विजयी झाले. प्रभाग १९ मध्ये पूर्ण पॅनल निवडून आल्याने पक्षात त्यांचे वर्चस्व वाढले.
महापौर पदाच्या शर्यतीत त्यांचेही नाव असल्याची चर्चा होती. मात्र, विधी समिती सदस्यपदी शिंदे यांना संधी दिली होती. मात्र, दोन वर्षे कोणत्याही पदावर काम करणार नसल्याचे सांगत शिंदे यांनी गटनेते एकनाथ पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला. (वार्ताहर)

Web Title: Sheetal Shinde's 'Riddhi' resigns