शेलपिंपळगाव, कुरुळीला सामाजिक धार्मिक कार्यक्रमांवर भर
By Admin | Updated: September 3, 2014 00:42 IST2014-09-03T00:42:31+5:302014-09-03T00:42:31+5:30
खेड तालुक्याच्या पूर्व भागात गणोशोत्सवानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक देखावे तयार करण्यात आले आहेत.

शेलपिंपळगाव, कुरुळीला सामाजिक धार्मिक कार्यक्रमांवर भर
शेलपिंपळगाव/कुरूळी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात गणोशोत्सवानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक देखावे तयार करण्यात आले आहेत.
शेलपिंपळगाव येथील सार्वजनिक गणोश मित्र मंडळाच्या वतीने आकर्षक आरास करण्यात आली आहे. येथील मोहितेवाडीत दर वर्षीप्रमाणो याही वर्षी गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. मंडळाच्या वतीने गणपती मंदिर व चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या कडेला विद्युतरोषणाई, आरास करण्यात आली आहे. कुशाबा तरुण मित्र मंडळ, जय हनुमान गणोश तरुण मित्र मंडळ, अमरज्योत फ्रेंड्स सर्कल या मंडळांच्या वतीने भाविकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात असल्याची माहिती माजी उपसरपंच शरद मोहिते यांनी दिली.
कोयाळी-भानोबाची येथील बापदेव तरुण मंडळ, भोलेनाथ तरुण मंडळ, भाडळेवस्तीतील भानोबा तरुण मंडळ, कोळेकरवस्तीतील राजमाता अहिल्याबाई गणोश मंडळ आदी मंडळांनी धार्मिक कार्यक्रमांवर भर दिला आहे.
प:हाडवाडी येथील स्वामी समर्थ स्कूलमध्ये चिमुकल्या विद्याथ्र्यानी सलग दुस:या वर्षी गणरायाची स्थापना केली आहे. साबळेवाडी येथील शेटेवस्तीत जगदंब तरुण मंडळाने सामुदायिक गणोशोत्सव साजरा करून भव्य मंडप घालून आजूबाजूला आरास तसेच विद्युतरोषणाई केली आहे, अशी माहिती पंकजबापू हरगुडे यांनी दिली. गावात शिवशंभो तालीम गणपती मंडळाने तालमीत श्रींची प्राणप्रतिष्ठा केली आहे. सिद्धेगव्हाण येथे महाराजा ग्रुप गणोश मंडळाने माळीण दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर गणोशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थापक पै. अनिल साबळे-पाटील यांनी दिली. बहुळ (ता. खेड) येथील शिवाई प्रतिष्ठान गणोश मंडळाने दर वर्षीप्रमाणो श्रींची स्थापना करून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती सरपंच निर्मलाताई पानसरे, मंडळाचे संस्थापक ग्रामपंचायत सदस्य धैर्यशील पानसरे यांनी दिली.
श्रीकृष्णनगर येथील श्रीकृष्ण गणोश मंडळ सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने स्वच्छता अभियान, श्रमदान असे उपक्रम राबवत असल्याची माहिती संस्थापक अतुल कुटे यांनी दिली. शेलगाव येथील दत्त तरुण मंडळ, गावठाण गणपती, रुद्रप्रिय तरुण मंडळ, खंडोबाआळी तरुण मित्र मंडळ यांनी दर वर्षीप्रमाणो सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम घेण्यावर भर दिला असल्याची माहिती माजी सरपंच संतोष आवटे यांनी दिली. (वार्ताहर)