पाण्याच्या टाकीत ढकलून भाच्याचा खून

By Admin | Updated: September 22, 2014 05:23 IST2014-09-22T05:23:56+5:302014-09-22T05:23:56+5:30

वारज्यातील चार दिवसांपूर्वी साडेचार वर्षांच्या मुलाचा खून झाला होता. तो खून त्याच्या मामीनेच केल्याचे रविवारी उघडकीस आले आहे

Shedding blood in the water tank | पाण्याच्या टाकीत ढकलून भाच्याचा खून

पाण्याच्या टाकीत ढकलून भाच्याचा खून

वारजे : वारज्यातील चार दिवसांपूर्वी साडेचार वर्षांच्या मुलाचा खून झाला होता. तो खून त्याच्या मामीनेच केल्याचे रविवारी उघडकीस आले आहे. आजारी असलेल्या मुलाचा सांभाळ करावा लागत असल्याने त्यास पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची कबुली त्या मुलाच्या सख्ख्या मामीने दिली आहे.
याबाबत वारजे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्रेयस ऊर्फ धम्म गायकवाड हा दुर्धर आजाराने ग्रासलेला असल्याने वरचेवर आजारी पडत असे. तसेच आई-वडील दोघेही कामावर जात असल्याने त्याचा सांभाळ त्याच इमारतीवर (बीएसयूपी, वारजे) सातव्या मजल्यावर राहणारी त्याची आजी, मामा व मामी करीत असे. तो आपल्या आजीकडेच राहावयास होता. दरम्यान, त्याच्या आजीच्या हट्टापायी आपल्याला या आजारी श्रेयसचा सांभाळ करावा लागत असल्याचा राग त्याच्या मामीच्या मनात होता. त्यामुळे तिने दोन वर्षांपूर्वीही श्रेयसला रॉकेल पाजून मारण्याचा प्रयत्न केला होता.
घटनेच्या दिवशी (दि. १७) घरात कोणी नाही हे पाहून मामीने श्रेयसला गच्चीवर नेले. आसपास कोणी आपल्याला पाहत नाही ना, हे तिने पाहिले व त्याला टाकीत ढकलून दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Shedding blood in the water tank