शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 16:17 IST

ससुन रुग्णालयाच्या क्रमांक तीनच्या लिफ्टमधे सोमवारी(दि.१६) मध्यरात्री तीन वाजता लोक अडकल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला मिळाली.

ठळक मुद्देअग्निशमन दलाच्या जवानांची कौतुकास्पद कामगिरी तीस मिनिटातच गरोदर महिलेला अक्षरश: खांद्यावरुन बाहेर घेत इतरही लोकांची सुखरुप सुटका एका गरोदर महिलेला व तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या बाळाला मोठे जीवदानडॉक्टर्स, वॉर्ड बॉय व इतर लोकांनी टाळ्या वाजवून दलाच्या जवानांचे केले कौतुक

पुणे - ससुन रुग्णालयाच्या क्रमांक तीनच्या लिफ्टमधे सोमवारी(दि.१६) मध्यरात्री तीन वाजता लोक अडकल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला मिळाली. दलाने नायडू अग्निशमन केंद्र व मुख्यालय येथून दोन वाहने तातडीने रवाना केली. अग्निशामक दलाचे जवान अवघ्या काही मिनिटातच ससुन रुग्णालयात पोहोचले. पण परिस्थिती गंभीर होती. लिफ्टमध्ये प्रसुतिकरिता शासकीय रुग्णवाहिकेतून आलेली महिला तसेच डॉक्टर व इतर चार असे एकूण सहाजण अडकल्याचे जवानांनी पाहिले. महिलेची अवस्था पाहून जवानांनी केंद्रप्रमुख विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव काम सुरु केले.घटनास्थळी लिफ्टमधे तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे दिड वाजण्याच्या सुमारास हे सहाजण अडकले होते. त्यामधे शासकीय रुग्णवाहिकेतून प्रसुतीकरिता तातडीचे म्हणून एका महिलेला प्रसुतिची वेळ असल्याने उपचाराकरिता आणले होते. परंतू, ती महिला व स्वत: रुग्णवाहिकेतील डॉक्टर व इतर चार या लिफ्टमधे तळमजला व पहिल्या मजल्याच्या मधोमध अडकून पडले. लिफ्टमधून मोबाईलवर कोणाशीही संपर्क होत नव्हता. सुमारे तासाभरानंतर अग्निशमन दलाला वर्दी दिली गेली. जवानांनी लिफ्टच्या डक्टमधे प्रवेश करुन  व इतर जवानांनी लिफ्टच्या बाहेर खुर्ची ठेवून कौशल्याने तीस मिनिटातच गरोदर महिलेला अक्षरश: खांद्यावरुन बाहेर घेत इतर ही लोकांची सुखरुप सुटका केली. तेथील डॉक्टर्स, वॉर्ड बॉय व इतर लोकांनी टाळ्या वाजवून दलाच्या जवानांचे कौतुक केले. या बचाव कामगिरीमधे नायडू अग्निशमन केंद्राचे अधिकारी विजय भिलारे, तांडेल तानाजी मांजरे, चालक करिम पठाण, ज्ञानेश्वर भाटे व जवान जयेश गाताडे, विजय पिंजण, विष्णू जाधव, रवि जाधव, विनायक माळी, अक्षय दिक्षित यांनी सहभाग घेत एका गरोदर महिलेला व तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या बाळाला मोठे जीवदानच दिले.

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलfire brigade puneपुणे अग्निशामक दलWomenमहिला