‘ती’ सध्या करतेय धोकादायक होडीतून प्रवास!
By Admin | Updated: January 25, 2017 01:43 IST2017-01-25T01:43:15+5:302017-01-25T01:43:15+5:30
पावसाळा सुरु झाला की डिंभे धरणाचे पात्र तुडुंब भरते. पुढील सहा महीने बेंढारवाडी, पाटण व अडिवरे खो-यात या पाण्यामुळे दळणवळणाची

‘ती’ सध्या करतेय धोकादायक होडीतून प्रवास!
कांताराम भवारी / डिंभे
पावसाळा सुरु झाला की डिंभे धरणाचे पात्र तुडुंब भरते. पुढील सहा महीने बेंढारवाडी, पाटण व अडिवरे खो-यात या पाण्यामुळे दळणवळणाची मोठी समस्या निर्माण होते. अशावेळी जिवावर उदार होवून धोकादायक होडीच्या सहाय्याने या भागातील आदिवासींना प्रवास करावा लागतो. पोहता येत आसलेले पुरूष काहीशे धाडसाने होड्यांचा वापर करतात. मात्र महीलांना नाविलाजास्तव होड्यांचा आधार घ्यावा लगतो. वर्षातील सहा महीने पाण्याचा वेढाच पाणलोट क्षेत्रातील गावांना पडत आसल्याने प्रवासासाठी धोकादायक का होईना ही होडीच आदिवासी गावांतील बाया-बापड्यां समोर एक पर्याय शिल्लक आसतो.
आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागातील पाटण, बेंढारवाडी व अडिवरे या तीन खो-यांत डिंभे धरणाचे विस्तिर्ण क्षेत्र पसरले आहे. पावसाळा सुरू होताच या भागात मोठ्या प्रमाणात होणा-या पावसामुळे डिंभे धरण तुडूंब भरते. या धरणाचे बॅकवॉटर धरणाच्या भींती पासून सुमारे २० ते २५ कि.मी. पर्यंत आत आहे. या भागातील नागरीकांचा कोंडवाडा होतो. दळणवळणाची गैर सोय सुरू होते. अशावेळी आदिवासी शेतकरी धरणातून प्रवास करण्यासाठी पत्र्याच्या होड्यांचा वापर करतात. अनेकदा लहान मुले व प्रसंगी महीलाही या होड्या हाकत आसल्याचे चित्र पाहवयास मिळते. कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नाही.