‘तिने’ मिळविले ९२ टक्के

By Admin | Updated: June 12, 2015 06:01 IST2015-06-12T06:01:53+5:302015-06-12T06:01:53+5:30

डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील आशा साळुंके हिने दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. घरी अठरा विश्वं दारिद्र्य, आई मूकबधीर, वडील

'She' captured 92 percent | ‘तिने’ मिळविले ९२ टक्के

‘तिने’ मिळविले ९२ टक्के

डोर्लेवाडी : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील आशा साळुंके हिने दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. घरी अठरा विश्वं दारिद्र्य, आई मूकबधीर, वडील व बहीण मतिमंद. वयाची ऐंशी वर्षं पूर्ण केलेल्या आजोबांनी दुधाचा धंदा करून शिक्षणासाठी साथ दिली. तिने तेवढ्याच जिद्धीने अभ्यास केला. डोर्लेवाडी (ता. बारामती) केंद्रात ९२ टक्के गुण मिळवून पहिला येण्याचा मान येथील आशा ज्ञानदेव साळुंके या विद्यार्थिनीने मिळविला आहे.
आशाची आई जन्मजात मूकबधिर, तर वडील व मोठी बहीणही मतिमंद आहेत. ८० च्या पुढे गेलेल्या वयोवृद्ध आजोबा केरबा साळुंके यांनी रात्रंदिवस काबाड कष्ट करून दुधाच्या रतिबावर घर प्रपंच चालविला.
मात्र, आशा हिची लहानपणा पासूनच शिक्षणात असलेली हुशारी पाहून अडाणी असणाऱ्या तिच्या आजोबांनी शिक्षणासाठी पडेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवली.
सकाळी लवकर उठून गुरांच्या धारा काढणे. चारा पाणी
करणे, आजोबांना बरोबर घेऊन बारामती येथे अनेक घरी रतीबाचे दूध देणे असा दिनक्रम सुरू होता. त्यामुळे मिळेल त्या वेळेत अभ्यास करणे तिने सोडले नाही. घरी अभ्यासासाठी अनुकूल कौटुंबिक वातावरण नसल्यामुळे पहाटे व रात्री अगदी घराच्या छतावर देखील तिने अभ्यास केला आहे.
केंद्रात पहिला क्रमांक आल्याची बातमी मिळाल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शेजारच्या मुलींनी सांगितल्यानंतर तिचे आई, वडील व आजी आजोबांच्याही डोळ्यातून आनंदाने अश्रूंच्या धारा वाहत होत्या... तिच्यावर कालपासून गावातील ग्रामस्थ व शिक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत होता. अनेकांनी घरी जाऊन तिचे अभिनंदन केले. (वार्ताहर)

Web Title: 'She' captured 92 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.