शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी '' ती '' एक वर्षाच्या बाळाला घेऊन दुबईवरुन पुण्यात आली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 20:02 IST

मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी परदेशातून भारतात परतण्याचे प्रमाण तसे फार कमी आहे.

पुणे : लोकसभेच्या तिसऱ्या  टप्प्यांसाठी देशात ११७ ठिकाणी तर राज्यात १४ ठिकाणी मतदान करण्यात आले. मंगळवारी मतदानाच्या दिवशी अनेक नागरिकांनी रोजच्या धावपळीतून, विवाह बंधनात अडकण्याआधी वेळ काढत, उन्हाचे चटके सोसत, तब्येतीची पर्वा न करता दोन तीन मजले चढत मतदानाचा हक्क बजावला. पण मतदानासाठी चक्कं '' ती '' दुबईहून आपल्या एक वर्षांच्या तान्हुल्या बाळासह पुण्याला आली. तिने मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. सायली सिताराम तोंडेपाटील - मोरे असे या माहिलेचे नाव आहे.  पुण्यात काँग्रेसचे मोहन जोशी व भाजपाचे गिरीश बापट यांच्यात चुरशीची लढत आहे. मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी परदेशातून भारतात परतण्याचे प्रमाण तसे फार कमी आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. खास मतदानासाठी दुबईहून पुण्यात आलेल्या सायली तोंडे -मोरे म्हणाल्या, माझे वडील एक सामाजिक कार्यकर्ते असल्याने आमच्या कुटुंबात मतदानाविषयी जागृती होती. मला स्वत: ला माझ्या बाबांकडून वारंवार मतदानाचे महत्व समजले आहे. त्यामुळे मतदान करणे हे अत्यावश्यक असल्याचे माझे ठाम मत आहे. त्यामुळेच मी माझ्या १ वर्षांच्या बाळाला घेऊन खास मतदान करण्यासाठी दुबईवरून पुणे गाठले. इथे आल्यावर कोथरुड येथे मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर मला स्वत:ला खूप समाधान वाटत आहे.तसेच राष्ट्रीय कर्तव्य पार पडल्याचा आनंद देखील अनुभवायला मिळाला आहे.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणVotingमतदानDubaiदुबई