शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 03:44 IST2016-10-06T03:44:38+5:302016-10-06T03:44:38+5:30
शहरात सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव शांततेत, पण उत्साहात साजरा होत आहे. गावातील अनेक मंदिरांतून घटस्थापना करण्यात आली असून, विविध सार्वजनिक मंडळेदेखील हा उत्सव साजरा

शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात
सासवड : शहरात सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव शांततेत, पण उत्साहात साजरा होत आहे. गावातील अनेक मंदिरांतून घटस्थापना करण्यात आली असून, विविध सार्वजनिक मंडळेदेखील हा उत्सव साजरा करीत आहेत.
येथील धान्य बाजारातील दत्त मंडळाचे हे ४४ वे वर्ष असून, नैमित्तिक महाआरती व अष्टमीला होम आदी कार्यक्रम असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष विनोद ओव्हाळ आणि महेश शिंदे यांनी सांगितले. २१ वे वर्ष असणाऱ्या बुरुड आळीतील शिवशक्ती मंडळही साध्या पद्धतीने हा सण साजरा करीत असल्याचे सिद्धार्थ साळुंखे यांनी सांगितले. आपले पहिलेच वर्ष असणाऱ्या खंडोबानगरातील मंडळाने तेथील महिलांना संधी देत हा सोहळा साजरा करीत असल्याचे विकास भांडवलकर यांनी सांगितले. माया महेश शितोळे, ललिता रमेश खोमणे, जया प्रवीण खोमणे, देवी धर्मा राठोड आदी महिला हा उत्सव साजरा करीत असून, मंडळाने अमरनाथ येथील प्रसिद्ध पिंडीचा देखावा उभा केला आहे.
शहरातील इंदिरानगर आणि अशोकनगरात सुवर्ण अष्टविनायक मंडळ आपला उत्सव साधेपणाने साजरा करीत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अमन हिर्लेकर यांनी सांगितले. सासवडच्या पुरातन तुळजाभवानी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. प्रत्येक दिवशी नवरात्रीच्या दिवसाचे महत्त्व सांगणारे फलक लावण्यात येत असल्याचे मधुबाला श्याम महाजन यांनी सांगितले. विद्यमान नगरसेवक वामन जगताप अध्यक्ष असणाऱ्या संत सोपानदेव मंडळानेही सुंदर सजावट करून देवीची प्रतिष्ठापना केली असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
च्राजमुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पहिलेच वर्ष
साजरे करणाऱ्या गिरमे आळीतील मंडळाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ठेवल्याचे
अध्यक्ष मंदार गिरमे यांनी सांगितले. संगीत खुर्ची, महाराष्ट्राची लोकधारा, जागरण-गोंधळ, डान्स स्पर्धा, प्रा. नितीन बानगुडे यांचे व्याख्यान, होममिनिस्टर आणि समाजातील मान्यवरांना पुरस्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे गिरमे यांनी सांगितले.
च्सासवडच्या सोपाननगरातील ओम शिवशक्ती
मंडळाने दर वर्षांप्रमाणेच साधेपणाने हा उत्सव
साजरा करण्यावर भर दिला आहे. हिवरकर मळ्यातील टाकमाईमाता, कोंडीत नाक्यावरील तुळजाभवानी, लांडगे आळीतील तुकाईदेवी यांसह सर्वत्र उत्साहात हा सोहळा साजरा होत आहे.