शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

उटी मोगऱ्याच्या सुगंधात विराजमान शारदा गजानन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 16:50 IST

शारदा गजाननाच्या मूर्तीला चंदन उटीचे लेपित श्रीं च्या मूर्तीने उपस्थित भक्तांची लक्ष वेधून घेतले

ठळक मुद्दे १५० किलो मोगरा, २०० किलो जुई, आणि १६ हजार गुलाबाची फुले मोगरा महोत्सवासाठी वापरमहाउटीभजनाच्या सांगता परंपरेला यंदा ७१ वर्षे पूर्ण

पुणे : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी... आवडे हे रुप, गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले...पाहता श्रीमुख सुखावले सुख या टाळ-मृदुंगाच्या साथीने सुरेल भजनांनी भारावलेले भक्तिमय रंगाला आलेले उधाण, त्याला सुवासिक मोगऱ्यांच्या फुलांची सुशोभित आकर्षक आरास अशा मंत्रमुग्ध वातावरणात शारदा गजाननाच्या मूर्तीला चंदन उटीचे लेपित श्रीं च्या मूर्तीने उपस्थित भक्तांची लक्ष वेधून घेतले. ही फुलांची आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाईने हा सोहळा संस्मरणीय ठरला. हे क्षण डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.    अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजानन मंदिरात पुण्यनगरीच्या वासंतिक उटी भजनाची सांगता झाली. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, विश्वास भोर, देविदास बहिरट, माऊली टाकळकर, मधुकर घाडगे, राजेश करळे, तुषार शिंदे, नारायण चांदणे, दादा मोरे, भारतीय वारकरी मंडळाचे संदीप महाराज पळसे, संदीप महाराज सपकाळ, नारायणराव पवार, पांडुरंग अप्पा दातार आदी उपस्थित होते. मंडळाच्या या महाउटीभजनाच्या सांगता परंपरेला यंदा ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वप्नील मोहिते आणि कारागिरांनी फुलांची आरास केली. पुण्यनगरीत सुरु होणाऱ्या वासंतिक उटी भजनाची सांगता ६८ दिवसांनी महात्मा फुले मंडईतील शारदा गजानन मंदिरात होते. अतिशय संस्मरणीय असा हा सोहळा असतो. यानिमित्त मंदिरात मोगरा महोत्सव केला जातो. यंदा मोगरा, जुई, गुलाब आदी फुलांची आरास करण्यात आली होती. १५० किलो मोगरा, २०० किलो जुई, आणि १६ हजार गुलाबाची फुले मोगरा महोत्सवासाठी वापरण्यात आली असल्याचे अण्णा थोरात यांनी सांगितले. सुमारे ७५ वर्षांपूर्वी, पुण्यातील लिंबराज महाराज मठ येथे सुरु झालेला हा उटी भजनाचा सोहळा आजवर अखंडितपणे सुरु आहे. भजनासाठी वारकरी सांप्रदायिक चाली व पारंपरिक सांगितीक चाली वापरतात. भगवान विष्णूंचे आवडते वाद्य पखवाज, तबला व संवादिनी यांची साथ भजनाला असते. सध्या तरुणवर्गाचा सहभाग यामध्ये वाढताना दिसत आहे. या उटी भजनासाठी शहरासोबतच पाषाण, कर्वेनगर, कोथरुड, एरंडवणा, घोरपडी, संगमवाडी, कात्रज, येरवडा आदी भागातून भजनकरी सहभागी होतात.

टॅग्स :Puneपुणे