शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शरदराव आम्हाला बाळासाहेबांसमान! बाळा नांदगावकर : पवारांना दुसरा ‘पी’ कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 05:34 IST

सध्या निष्ठावान कोणाला म्हणावं हे कळण्यास मार्ग राहिला नाही, असे सांगत शरदराव आम्हाला बाळासाहेबांच्या जागी असून, त्यांच्या बद्दल आदर आहे, असे वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

पुणे : सध्या निष्ठावान कोणाला म्हणावं हे कळण्यास मार्ग राहिला नाही, असे सांगत शरदराव आम्हाला बाळासाहेबांच्या जागी असून, त्यांच्या बद्दल आदर आहे, असे वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.राजकारणासह समाजकारण, सहकार आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त बालेवाडी येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना नांदगावकर यांनी चांगलीच फटकेबाजी केली.शरद पवारांवर स्तुतीसुमने ओवाळत नांदगावकर म्हणाले, शरदराव आम्हाला बाळासाहेबांच्या जागी आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. शरदरावांचे बोट धरून अनेकजण राजकारणात आले. अगदी गुजरातहून आले आणि पंतप्रधान झाले. पण पवारसाहेब तुम्हाला एक पी (पद्मविभूषण) मिळाला दुसरा पी (पंतप्रधानपद) कधी मिळणार?पुढे नांदगावकर म्हणाले, आमच्या पक्षाचं कुठेही सरकार नसल्याने आम्हाला काही कामच उरलं नव्हतं. सध्या फेरीवाल्यांचा मुद्दा हाती लागल्याने भारी काम झालं आहे. राजकारणातही फेरीवाले निर्माण झाले आहेत. सध्या गिरीश बापटांच्या पक्षात फेरीवाल्यांची जोरदार चर्चा आहे, या नांदगावकरांच्या वाक्यावर एकच हशा पिकला....अन् पुणेकरांच्या मनातील खंत दूर केलीसदानंद मोहोळ आणि अशोक मोहोळ हे चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत होते. पुढे चालून त्यांनी देशाचे नेतृत्व देखील केले असते. मात्र काही कारणास्तव त्यांनी मध्येच क्रिकेट थांबवले. याबाबत जिल्ह्यातील लोकांच्या मनात खंत होती. परंतु जगाच्या क्रिकेट संघटनेचे नेतृत्व करून मी पुणेकरांच्या मनात असलेली खंत दूर केली, अशी आठवण शरद पवार यांनी येथे सांगितली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBala Nandgaonkarबाळा नांदगावकरMNSमनसे