शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता

By राजू इनामदार | Updated: May 9, 2025 19:15 IST

दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण : पवार राजकीय विश्वासार्हता पणाला लावणार नाहीत  

पुणे : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जायचे किंवा नाही याचा निर्णय नवीन पिढी घेईल, या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे) या प्रमुख पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पवार या प्रकारचा निर्णय घेणार नाहीत, असे आघाडीच्या काही नेत्यांना वाटते, तर राजकारणात काहीही होऊ शकते, असे काहींचे मत आहे.आमच्या पक्षात एक गट अजित पवार यांच्याबरोबर जावे या मताचा आहे, तर दुसरा जाऊ नये, या मताचा. यासंबंधीचा निर्णय नवी पिढी घेईल, खासदार सुप्रिया सुळे यांचा यात पुढाकार असेल, असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले. त्याचबरोबर ‘मी या प्रक्रियेत नाही’, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्याच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष गुंतले आहेत, महाविकास आघाडी म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबर लढण्याची मोर्चेबांधणी सुरू असतानाच ऐनवेळी पवार यांनी असे भाष्य केल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांसह त्यांच्या बरोबर असलेल्या समविचारी पक्षांच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले की, पवार असा काही निर्णय घेतील, असे वाटत नाही. त्यातही राजकीय जीवनाच्या अशा टप्प्यावर ते स्वत:ची विश्वासार्हता पणाला लावणार नाहीत. पण, पक्षातील लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे असा काही निर्णय झालाच, तर त्याचा काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही. राज्यघटना प्रमाण मानणाऱ्या, तसेच धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असणाऱ्या समविचारी पक्षांना बरोबर घेत भारतीय जनता पक्षाला पराभूत करणे हा काँग्रेसचा उद्देश आहे. तेच धोरण आहे. त्यानुसार आम्ही वाटचाल करणार.शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितले की, ही चर्चा अजित पवार फुटून सत्तेत सहभागी झाले तेव्हापासून सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय होईलच असे नाही. मात्र, निर्णय घेण्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे किंवा त्यांच्या सर्व लोकप्रतिनिधींनी ते महाविकास आघाडी म्हणून निवडून आले आहेत, मतदारांनी त्यांना त्यासाठी मते दिली आहेत, हे लक्षात घ्यावे. आपले लोकप्रतिनिधीत्व कायम ठेवून त्यांनी एकत्रीकरणाचा निर्णय घेतला, तर मग फुटून बाहेर पडत पक्षचिन्हही चोरणारे व हे यांच्यात काहीच फरक राहणार नाही. एकत्रीकरण झालेच, तर आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय ते ठरवतील. आमच्यासाठी ते महत्त्वाचे आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवार