शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात
By Admin | Updated: December 14, 2015 00:04 IST2015-12-14T00:04:39+5:302015-12-14T00:04:39+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या मागासवर्गीय विभाग व फुले-शाहू-आंबेडकर विचार

शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या मागासवर्गीय विभाग व फुले-शाहू-आंबेडकर विचार फाउंडेशनच्या वतीने गरजूंना कानटोपी व हातमोजे वाटण्यात आले. या वेळी पिंपरी, बोपोडी, खडकी व बाणेर या भागात या थंडीच्या कपड्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी मागासवर्गीय सेलचे माजी उपाध्यक्ष मोहन सोनावणे, कमल ढोले-पाटील, सुनील बनकर, पीएमपीएलचे संचालक व नगरसेवक आनंद आलकुंटे उपस्थित होते.
विद्या प्रतिष्ठानच्या बारामती वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कामायनी शाळेमध्ये वृक्षारोपण व तेथील मुलांसाठी खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात
आला.
रयत शिक्षण संस्थेच्या हुतात्मा राजगुरूविद्यालयात पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, ग्रंथप्रदर्शन व हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या.
पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ताडीवाला रोड येथील समर्थ श्रीपती बाबा जनता विद्यालयातील मुलांना खाऊवाटप करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचे आनंद सवाणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.