शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

शरद पवारांचे स्वीय सहाय्यक ते कॅबिनेट मंत्री व्हाया विधानसभा अध्यक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 15:51 IST

पुणे जिल्ह्यातून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार यांची सध्या सर्वाधिक चर्चा असली तरी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेणारे दिलीप वळसे पाटील यांचीही कारकीर्द तितकीच प्रदीर्घ आणि दमदार आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची प्राथमिक ओळख आहे. 

पुणे : पुणे जिल्ह्यातून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार यांची सध्या सर्वाधिक चर्चा असली तरी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेणारे दिलीप वळसे पाटील यांचीही कारकीर्द तितकीच प्रदीर्घ आणि दमदार आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची प्राथमिक ओळख आहे. 

वकिलीची पदवी घेतल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काहीकाळ काम केले. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात असा जम बसवला की सलग सातव्यांदा ते निवडून आले आहेत. १९९० साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर नावापुढचे आमदार पद कायम आहे. त्यानंतर  १९९९ मध्ये त्यांची उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २००१ पासून त्यांच्याकडे उर्जा खात्याचाही कार्यभार आला. राज्याला भारनियमनमुक्त करण्यात त्यांचे विशेष योगदान आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. डिसेंबर २००८ ते नोव्हेंबर २००९ या काळात अर्थ आणि नियोजन मंत्री म्हणून त्यांनी काम केले. २००९ ते २०१४ या काळात विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्याहीवेळी आक्रमक  सदस्यांना न दुखावता शांतपणे थांबवण्याचे काम त्यांनी लीलया केले होते. सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची उभारणी त्यांनी केली. साखर उद्योगात संपूर्ण महाराष्ट्रात अभ्यासू म्हणून वळसे पाटील ओळखले जातात.

शांत, अभ्यासू, मुद्देसूद आणि अबोल स्वभावाचे वळसे पाटील क्वचितच भरभरून बोलतात. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना ज्येष्ठत्वाचा मान आहे. त्यांची मंत्रिपदाची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. त्यांच्या निवडीने मंत्रिमंडळात एक अनुभवी सदस्य समाविष्ट करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMaharashtraमहाराष्ट्रambegaon-acआंबेगाव