महापौर बदलासाठी शरद पवारांना साकडे

By Admin | Updated: June 25, 2016 00:32 IST2016-06-25T00:32:06+5:302016-06-25T00:32:06+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे यांना बदलावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली असून, याबाबत एका गटाने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद

Sharad Pawar swears for Mayor's change | महापौर बदलासाठी शरद पवारांना साकडे

महापौर बदलासाठी शरद पवारांना साकडे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे यांना बदलावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली असून, याबाबत एका गटाने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि अजित पवार यांना निवेदन दिले आहे. महापौर बदलाबाबत साकडे घातले आहे.
महापौरपद अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित होते. त्यामुळे या पदावर संधी मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन नगरसेविका आशा सुपे यांनी पक्षनेत्यांना दिले आहे. ‘‘महापौरपदी तीनही सदस्यांना समान कालावधीप्रमाणे संधी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते.
मात्र, कालावधी संपूनही दुसऱ्यांना संधी दिलेली नाही. मला या पदावर संधी द्यावी.’’ महापौर बदलाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. (प्रतिनिधी)

महापालिकेत या पदासाठी धराडे यांच्यासह रामदास बोकड, आशा सुपे असे तीन जण इच्छुक होते. सुरुवातीला आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या धराडे यांना संधी देण्यात आली. त्यानंतर उर्वरित दोघांना समान कालावधीनुसार संधी दिली जाईल, असे ठरले होते. दरम्यानच्या कालखंडात विधानसभा निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादीला अपयश मिळाले. मात्र, धराडे यांचा कालावधी संपुष्टात येऊनही महापौरपदी अन्य सदस्यांना संधी दिलेली नाही.

Web Title: Sharad Pawar swears for Mayor's change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.