शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी विभागीय आयुक्तांसह पालिका आयुक्तांना झापले ; 'जम्बो'मधील असुविधांबाबत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 20:47 IST

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना

पुणे : कोट्यवधी रुपयांचा खर्चाचे जम्बो रुग्णालय उभारल्यानंतरही आरोग्य व्यवस्था का सुधारत नाही, असा थेट सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव आणि आयुक्त विक्रम कुमार यांना केला. अधिका-यांनी उपाययोजनांसंबंधी दिलेल्या माहितीवरुनही त्यांनी नाराजी व्यक्त करत अधिका-यांना झापत व्यवस्था सुधारण्याच्या सक्त सूचना केल्या. 

शरद पवार मागील दोन दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचा आढावा घेत आहेत. गुरुवारी त्यांनी पिंपरी चिंचवडमधील परिस्थितीचा आढावा घेतला. शुक्रवारी त्यांनी विभागीय आयुक्त आणि पालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांसोबत बैठक घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी शुक्रवारी अधिका-यांची बैठक घेत उपाययोजना, यंत्रणांमधील समन्वय आदींचा आढावा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या जम्बो रुग्णालयामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच बिकट झाल्याचे पहायला मिळते आहे. रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळत नसल्याने आठवड्याभरात 30 पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या उपचारा अभावी झालेल्या मृत्यूप्रकरणीही पवार यांनी अधिका-यांची चांगलीच कानउघडणी केली. जम्बो रुग्णालयाचा नागरिकांना लाभ होतो आहे काय, कोरोना आटोक्यात आणण्याकरिता काय उपाययोजना करता आहात असे प्रश्न पवार यांनी अधिका-यांना केले.  दरम्यान, पवार शनिवारी महत्वपूर्ण बैठक घेणार असून या बैठकीला  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे महापलिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत. =====अजित पवारांनंतर स्वत: साहेब मैदानातउपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार दर आठवड्याला पुण्यात बैठक घेत कोरोनाचा आढावा घेतात. तसेच अधिका-यांना आवश्यक त्या सूचना करतात. जम्बो रुग्णालयाच्या उभारणीच्या कामाचीही त्यांनी प्रत्यक्ष जाऊन अनेकदा पाहणीही केली होती.  कोरोना आटोक्यात आणण्याबाबत अधिका-यांना त्यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये सूचना देऊनही फारसा फरक पडलेला दिसत नाही. आता खुद्द शरद पवारच मैदानात उतरले आहेत.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त