शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

Sharad Pawar: पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरच्या प्रमुख नेत्यांच्या बोलावलेल्या बैठकीवर शरद पवार म्हणाले, या भूमिकेचे स्वागतच, पण.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 17:40 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर विषयी प्रधानमंत्री जे काही म्हणाले त्याचे स्वागत आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जम्मू काश्मीरच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्वाची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भूमिकेचे समर्थन केले आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी भेटीच्यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार वंदना चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. या भेटीनंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

पवार म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरविषयी प्रधानमंत्री जे काही म्हणाले त्याचे स्वागत असून देेशाच्या ऐक्याच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. मात्र, आधी काश्मीरला स्वतंत्र दर्जा होताच,पण प्रधानमंत्र्यांनी तो काढून घेतला.आम्ही त्यांना असा निर्णय नको घ्यायला याबाबत सांगत होतो. मात्र, त्यांनी ते ऐकलं नाही.आता तो निर्णय चुकला असे त्यांना वाटत असेल तर चांगले आहे.फक्त आता घेतलेला निर्णय बदलू नये अशी अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांच्या नाराजगी प्रकरणावर भाष्य करताना पवार म्हणाले, कँन्सर हॉस्पिटल रूग्णांच्या नातेवाईकांसाठी खोल्या उपलब्ध करून देण्याबाबत डॉक्टरांनी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली होती. पण स्थानिकांनी तक्रार केली म्हणून त्यावर काही अडचण निर्माण झाली आहे. आता तो प्रश्न सुटला आहे. 

दिल्लीतील विविध नेत्यांच्या बैठकीबाबत बोलताना आम्ही काही आघाडी म्हणून बसलो नाही.जे काही करायचे ते काँग्रेसला बरोबर घेऊन असेच माझे मत व मी ते जाहीर केले आहे.आमची नेतृत्वाची बद्दल चर्चाच नाही.सामुदायिक नेतृत्व हवे असे मला वाटते. शरद पवारांनी असे ऊद्योग बरेच केले आहेत. आता मार्गदर्शन, सल्ला देणे हे काम करणार आहे. 

मराठा आरक्षणावर भाष्य करताना पवार म्हणाले, मराठा आरक्षणासंबंधी निर्णय घेण्याचा केंद्राकडेच अधिकार आहे, ही अगदी स्वच्छ भूमिका आहे. राज्य सरकार आणि मराठा संघटना यांच्यात संवाद सुरू आहे. त्यातूून मराठा समाजातील समस्या सोडवणार  आहे.

दिल्लीतील विविध पक्षांच्या, संघटनांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीबाबत बोलताना पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधी विविध पक्षांची बैठक घेतली. राजकीय अभिनिवेश न बाळगता संसदेत आपली भूमिका मांडण्यासाठी ही बैठक होती. त्यात दिल्लीत सहा महिन्यांहून अधिक काळ रस्त्यावर जे शेतकरी राजकीय पक्षाला वगळून आंदोलन करत आहे.मात्र त्याकडे केंद्र सरकारकडून त्याची आतापर्यंत दखल घेतलेली नाही. पण एका महत्वाच्या प्रश्नाला समर्थन कसे देता येईल यावर बैठक होती. संसदेचे काम सुरू झाल्यावर तिथे हा विषय कसा मांडता येईल यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर