शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

"शरद पवारांकडे पक्ष विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही..." चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 13:09 IST

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने पवार यांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली....

पुणे : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग केला, त्यानंतर त्यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता, हा त्यांचा इतिहास आहे. तसेच, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीत दोन पक्ष संपणार असल्याचे भाकीत केले, त्यावरून विलीनीकरण होणार हे लक्षात आले असेलच. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने पवार यांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उमेदवार मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, मनसेचे नेते बाबू वागस्कर, शहरप्रमुख साईनाथ बाबर आदी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, निवडणुकीमध्ये इलेक्टोरल बॉन्डमधून मिळालेले पैसे वाटले जात आहेत असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता, त्यावर बावनकुळे यांनी टीका करत चव्हाण यांचे हे वक्तव्य अपरिपक्व आहे. बॉन्डमधून मिळालेल्या पैशाचा हिशेब प्राप्तीकर विभागाला द्यावा लागतो. निवडणुकीत पैसे वाटप करण्याचे उद्योग हे काँग्रेसचेच आहेत. बारामतीच्या निवडणुकीत पैसे वाटपाचे व्हिडीओ व्हायरल करणे, तक्रारी करणे हा विरोधकांचा नियोजित कट होता अशी टीका बावनकुळे यांनी केली.

कांदा निर्यातीवरील निर्बंध उठवले आहेत, या निर्णयाचे स्वागत आहे. जीवनावश्यक वस्तूंबाबत आचारसंहितेत निर्णय घेता येतात, त्यामुळे आचारसंहिता भंग झालेला नाही. राज ठाकरे हे महायुतीसोबत आल्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दुखावले आहेत. विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने खोटे आरोप करून नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड