शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"चारच महिन्यांत सत्तेत गेले मग त्यावेळी परकीय मुद्दा कुठं गेला होता..." अजित पवार थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 21:44 IST

अजित पवारांची शरद पवारांवर टीका...

नारायणगाव (पुणे) : परकीय व्यक्ती आपल्या देशाचे पंतप्रधान नसावी म्हणून शरद पवार, पी. ए. संगमा, तारीक अन्वर यांनी वेगळी भूमिका घेतली आणि सन १९९९ काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. चारच महिन्यांत विलासराव देशमुख यांच्यासोबत मंत्रिमंडळात सामील झाले. त्यावेळी परकीय मुद्दा कुठे गेला? सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष होत्या, मग त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय त्यावेळी कसा घेतला? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळवंडी (ता. जुन्नर ) येथील शेतकरी मेळाव्यात व्यक्त केला. ममता बनर्जी स्वंतत्र निवडणूक लढविणार, पंजाब मुख्यमंत्री वेगळे लढणार, अशा पद्धतीने देश चालेल का? आघाडीत मोदीविरोधी सक्षम पर्याय आहे का? असा सवाल करून नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले .

दरम्यान, शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, काँग्रेसकडून विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण तर भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पदाची संधी असताना ती संधी का दिली गेली नाही? छगन भुजबळ, आर. आर. पाटील यांना संधी द्यायला हवी होती, अशी खंतही अजित पवार यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपळवंडी येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार हे बोलत होते. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, पोपटराव गावडे, प्रदीप वळसे पाटील, यशवंत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघ, सभापती संजय काळे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, गणपत फुलवडे, भगवान पासलकर, शरद लेंडे, रघुनाथ लेंडे, अशोक घोलप, किशोर दांगट, गुलाब नेहेरकर, भाऊ देवाडे, उज्वला शेवाळे वैष्णवी चतुर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यांना भाजप का चालत नाही?

अजित पवार पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे सरकार पडताना सगळ्यांनी भाजप सोबत जाण्याचे ठरवले. पवार साहेबांना शिवसेनेत गेलेले चालते पण भाजपसोबत गेलेले का चालत नाही? वरिष्ठांनी निर्णय घेतला तो बरोबर , आम्ही निर्णय घेतला तो बरोबर नाही, असं कसं? असा सवाल अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांना विचारला. राजकारणात हेतू परस्पर आरोप केला जातो. माझ्यावर ७० हजार कोटी रुपये भ्रष्टाचार आरोप केला. १९६० पासून जलसंपदा विभाने ४५  हजार कोटी खर्च केले आणि माझ्या आरोप होतो ७० हजार कोटीचा.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSonia Gandhiसोनिया गांधी