शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार आणि नितीन गडकरींच्या गुप्त भेटीने चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 19:26 IST

गडकरी आणि पवारांच्या बंद दाराआडच्या भेटीमुळे चर्चेला उधाण

ठळक मुद्देपुण्यात नितीन गडकरी आणि शरद पवार यांची गुप्त बैठक, चर्चेला उधाण पालखी मार्ग, पुरंदर विमानतळ विषयावर चर्चेची माहिती 

पुणे: भाजपा आणि शिवसेनेतील कटू संबंधामुळे निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.पुणे दौऱ्यावर आलेले गडकरी यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर पवार आणि गडकरी यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुखही उपस्थित होते. या बैठकीमध्ये पुरंदर विमानतळाला जोडण्यासाठी रेल्वे मार्ग तयार करण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, आळंदी व देहू येथून जुलैमध्ये सुरु होणाऱ्या वारीच्या मार्गाच्या डागडुजीबद्दल चर्चा करण्यात आली. मात्र, सर्वांना उत्सुकता असलेल्या दोन्ही नेत्यांमधील राजकीय चर्चेचा तपशील माध्यमांना पुरवण्यात आला नाही. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलने करून टीका करत आहे. मात्र, शरद पवार यांची मोदींशी असलेली जवळीक आणि त्यांच्या राजकारणाची आजवरची पद्धत पाहता वेळ पडलीच तर पवार भाजपाला बाहेरून का होईना, पण पाठिंबा देतील, ही शक्यताही नाकारता येत नाही. कालच पालघर निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा 'एकला चलो रे' हा सूर आळवला होता. त्यामुळे उद्या शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढलाच तर पर्यायी मोर्चेबांधणी म्हणून भाजपाकडून प्रयत्न सुरू झाले असावेत का, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadakriनितिन गडकरीSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस