शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आता शनिवारवाडा विकत घेता येईल! जागेच्या दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधकांना रान मोकळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 10:53 IST

फ्लॅट, जमीन , मालमत्ता यांचे दस्त नोंदणी करताना ती मालमत्ता अधिकृत की अनधिकृतही पाहण्याची जबाबदारी मुद्रांक विभागाची नाही, असा स्पष्ट निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे

पुणे : फ्लॅट, जमीन , मालमत्ता यांचे दस्त नोंदणी करताना ती मालमत्ता अधिकृत की अनधिकृतही पाहण्याची जबाबदारी मुद्रांक विभागाची नाही, असा स्पष्ट निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. यामुळे यापुढे गुंठेवारी आणि रेरा कायद्याचे उल्लंघन झालेले, आदिवासींच्या जमिनी अथवा एखाद्या सरकारी इमारत, जागेसाठी दस्त नोंदणीसाठी आल्यास अशी दस्त नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधकांना रान मोकळे झाले आहे. अगदी शनिवारवाडा किंवा महापालिकेची इमारतही योग्य मुद्रांक भरून नावावर करून घेता येणार आहे. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुद्रांक विभागाने पुण्यासह सर्व मोठ्या शहरांमध्ये दुय्यम निबंधकांवर केलेल्या कारवाई मागे घ्यावा लागणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  नोंदणी विभागाने दस्त नोंदणी करताना मूळ कायद्यामध्ये फक्त नोंदणी शुल्क वसुली आणि त्यावर आकारण्यात आलेल्या मुद्रांक शुल्काचे मूल्य योग्य असेल तर त्याची नोंदणी करावी ही तरतूद आहे. परंतु राज्य शासनाने नोंदणी अधिनियमामध्ये 44 (आय)  या कलमाखाली राज्य आणि केंद्र सरकारने मालमत्ता आणि जमीन विषयक काढलेले आदेश घातलेली बंदी याची अंमलबजावणी करून दस्त नोंदणी करण्याची तरतूद केली होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय मध्ये नोंदणी  अधिनियमातील 22 (अ)  या तरतुदी मध्ये  बसंत बहाटा विरुद्ध राजस्थान सरकार या खटल्यात निकाल देताना नोंदणी अधिनियमातील ही तरतूद रद्द केली. वास्तविक या खटल्यामध्ये महाराष्ट्र सरकार प्रतिवादी नव्हते तरी देखील महाराष्ट्रात ही तरतूद रद्द झाल्याने राज्य सरकारने 44 (आय)  शासन धोरणाप्रमाणे तरतुदी लागू करण्यासंदर्भातील कायदा केला. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे या तरतुदीला आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने 44 (आय )नुसार असणाऱ्या तरतुदी  दस्त नोंदणी करताना लागू होणार नाही असा निर्णय दिल्याने आता राज्य सरकारने ठरवलेली धोरणे आणि घालण्यात आलेले निर्बंध याचा कोणताही अंमल दस्त नोंदणी करताना होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे शहर आणि हवेली तालुक्यात गेल्या महिन्यात गुंठेवारी आणि रेरा कायद्याचे उल्लंघन करून दहा हजार पेक्षा जास्त बोगस दस्त नोंदणी करण्यात आली होती. या प्रकरणात 22 नोंदणी निबंधक यांच्यावर निलंबन, खातेनिहाय चौकशी आणि अन्य प्रकारच्या प्रशासकीय कारवाया करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे या कारवाया निस्तेज झाले आहेत. नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक कार्यालयाने संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा अभ्यास सुरू केला असून त्यावर पुढे काय कार्यवाही करायची याचा अहवाल शासनाला पाठवला जाणार  असल्याचे सांगण्यात आले.

पुण्यासह राज्यात हजारो बोगस दस्त 

गुंठेवारी आणि रेरा कायद्याचे उल्लंघन करून एकट्या पुणे शहरामध्ये दहा हजार पेक्षा जास्त बोगस दस्त नोंदणी करण्यात आली होती. या प्रकरणात 22 नोंदणी निबंधक यांच्यावर निलंबन, खातेनिहाय चौकशी आणि अन्य प्रकारच्या प्रशासकीय कारवाया करण्यात आल्या होत्या. याचप्रमाणे संपूर्ण राज्यात बोगस दस्त नोंदणी झाली आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे या कारवाया निस्तेज झाले आहेत. नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक कार्यालयाने औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा अभ्यास सुरू केला असून,  त्यावर पुढे काय कार्यवाही करायची याचा अहवाल शासनाला पाठवला जाणार  असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारSocialसामाजिकCourtन्यायालय