शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

पुणे ड्रग्ज प्रकरण: सुषमा अंधारेंची सरकारवर घणाघाती टीका, शंभुराज देसाईंनी दिले प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 23:59 IST

Pune Drugs Case News: पुणे ड्रग्ज प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे.

Pune Drugs Case News: पुण्यातून कोट्यवधींचे ड्रग्स पकडले गेले असताना आता थेट सर्रासपणे विक्री करतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला. फर्ग्युसन रस्त्यावरील एका नामांकित हॉटलेमधून सर्रास ड्रग्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असून, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली असून, मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले. 

पुण्यात कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पब, हॉटेल आणि बारवर पोलीस कारवाई सुरु झाली होती. एफसी रोडवरील एका पबमधील व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारा वेळ हा मध्यरात्री दीड नंतरचा असल्यामुळे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटे पाचपर्यंत पब सुरू असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. फर्ग्युसन रस्त्यावरील द लिक्वीड लिझर लाऊंज उर्फ एल३ हा पब पहाटे पाचपर्यंत सुरू होता, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. 

सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकरांकडून मोठे आरोप

एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या प्रकारावरून राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला महिन्याला तीन कोटी रुपये मिळतात, ते मंत्र्यांना पोहचात. तो हप्ता शंभूराज देसाई यांना जातो, असा मोठा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. तसेच पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर आम्ही तब्बल आठ ते नऊ महिन्यापासून सातत्याने भूमिका मांडत आहोत. जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे सापडले होते. तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले होते. शंभूराज देसाई यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. शंभूराज देसाई यांच्यासाठी करणारे उत्पादन शुल्कचे अधिकारी राजपूत यांचेही निलंबन झाले पाहिजे. हे झाल्याशिवाय पुणे सुधारणार नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. 

शंभुराज देसाई यांनी दिले प्रत्युत्तर

सुषमा अंधारेंनी आम्ही काय म्हणत आहे ते घेतले पाहिजे. हा व्हिडिओ आताच पहिला. याची चौकशी आम्ही करू. रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या महिन्याभरात आपण पुण्यात ४९ हॉटेल आणि बारवर कारवाई केली आहे. तसेच पुण्यात सरप्राईज चेकिंग सुरु करण्यात आले आहे. या प्रकारची गंभीर दखल घेऊन चौकशी करणार आहे. तेथील क्षेत्रीय  अधिकाऱ्याचीही चौकशी करणार आहोत. कुठल्याही अधिकाऱ्याबरोबर सरकारचे साटेलोटे नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. जो अधिकारी यात दोषी आढळेल, त्यावर कारवाई केली जाईल, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थPuneपुणेSushma Andhareसुषमा अंधारेShambhuraj Desaiशंभूराज देसाईShambhuraj Desaiशंभूराज देसाई