सातासमुद्रापलीकडून मदतीची ‘शाबासकी’

By Admin | Updated: March 17, 2015 00:26 IST2015-03-17T00:26:57+5:302015-03-17T00:26:57+5:30

घरची परिस्थिती हलाखीची... भंगार जमा करून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून कुटुंबाची गुजराण करणेही मुश्कील... त्यातच पत्नीला असाध्य आजार जडला... पैसे नसल्याने उपचार घेणे शक्य नव्हते...

'Shabasaki' help from Sathasamudra | सातासमुद्रापलीकडून मदतीची ‘शाबासकी’

सातासमुद्रापलीकडून मदतीची ‘शाबासकी’

पुणे : घरची परिस्थिती हलाखीची... भंगार जमा करून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून कुटुंबाची गुजराण करणेही मुश्कील... त्यातच पत्नीला असाध्य आजार जडला... पैसे नसल्याने उपचार घेणे शक्य नव्हते... अशातच भंगार गोळा करताना त्यात कोट्यवधी रुपयांचे सोने सापडल्यानंतर त्याचा मोह न बाळगता ते संबंधित व्यक्तीला परत करणारा प्रामाणिक भंगार विक्रेता... अशा प्रामाणिकतेची महती सोशल मीडियावरून
कळताच सातासमुद्रापलीकडून उपचारासाठी आर्थिक मदतीच्या रूपात मिळालेला मदतीचा हात... ही कोणती कहाणी नसून सुभाष वडावराव यांच्यासोबत घडलेली घटना आहे.
शिवाजीनगर झोपडपट्टी येथे राहणारे सुभाष हे दररोज भंगार जमा करून त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून घर चालवितात. त्यामुळे घरात अठराविश्वे दारिद्रय. अशातच त्यांच्या पत्नी शोभा यांना लठ्ठपणा आणि मधुमेहाचा आजार जडला आणि त्यांना घराबाहेर पडणेही मुश्किल झालले. मात्र पैसे नसल्याने त्यांच्यावर उपचार करणे सुभाष यांना शक्य होत नव्हते.
अशातच एके दिवशी भंगार जमा करताना त्यांना कोट्यवधी रुपयांचे सोने सापडले. हे सोने विकून त्यातून मिळणाऱ्या पैशांनी पत्नीचे उपचार आणि चांगले जीवन जगता येईल, याचा विचार न करता सुभाष यांनी संबंधित सोने कोणत्या व्यक्तीचे आहे त्याला ते परत केले.
मात्र त्या व्यक्तीने या प्रामाणिकतेचा मोबदला म्हणून काही पैसे सुभाष यांच्या हातात टेकविले.
अशातच सुभाष यांच्या प्रामाणिकतेची ही घटना सोशल मीडियावरून सगळीकडे पसरली आणि ती अमेरिकेतील एम. के. वालिया यांना कळाली. त्यांनी लगेचच तेथून सुभाष यांना आर्थिक मदत देऊ केली. त्यातून सुभाष यांनी पत्नीवर उपचार करण्याचा निर्णय घेतला.
लॅप्रो ओबेसो सेंटरचे संचालक व बॅरिअट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी त्यांच्यावर बॅरिअट्रिक शस्त्रक्रिया केली. त्यातून शोभा यांचे दहा किलो वजन कमी झाले आणि मधुमेहही आटोक्यात आला.
मात्र त्यानंंतर पुढील उपचार आणि औषधांसाठी पैसे नसल्याने डॉ. शहा यांनी ओबेसिटी अ‍ॅन्ड डायबेटिस फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आणि शोभा व सुभाष वडावराव यांचे जीवनच पालटले. (प्रतिनिधी)

शस्त्रक्रियेपूर्वी पाय सुजले होते. मधुमेह झाल्याचे कळाले होते. मात्र त्यावर उपचारासाठी पैसेच आमच्याकडे नव्हते. अशातच आम्हाला प्रामाणिकतेमुळे मदत मिळाली आणि त्यातून माझ्यावर चांगले उपचार झाले आणि मी आजारातून मुक्त होण्याच्या मार्गावर पोहोचले आहे.
- शोभा वडावराव

Web Title: 'Shabasaki' help from Sathasamudra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.