पिंपरी-चिंचवड (वाकड) : घरी कोणी नसल्याचा गैरफायदा उचलत दगड कापण्याची मशीन मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका नराधमाने सोळा वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार थेरगाव येथे रविवारी घडला आहे. याप्रकरणी २४ वर्षीय तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पीडित मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या एका २६ वर्षीय आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. रवी ग्यासीराम जाटव (वय २६,सध्या रा.डोंगरे कॉर्नर, थेरगाव, मूळगाव- मोरेनागाव, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी जाटव हा रविवारी दुपारी पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत दगड कापण्याची मशीन पाहिजे या बहाण्याने घरात घुसला. त्यानंतर त्याने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर तीन वेळा पाशवी बलात्कार केला. पीडित मुलीच्या नातेवाईकांना ही बाब समजताच त्यांनी आरोपीचे घर गाठून जाब विचारला असता त्यांनाही पोलिसात गेला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या गुन्हयाचा वाकड पोलीस तपास करत आहेत..
जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 17:40 IST
घरी कोणी नसल्याचा गैरफायदा उचलत दगड कापण्याची मशीन मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका नराधमाने सोळा वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार थेरगाव येथे रविवारी घडला आहे.
जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
ठळक मुद्देपीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर तीन वेळा पाशवी बलात्कार