कर्वेनगरमध्ये पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
By Admin | Updated: January 17, 2015 00:07 IST2015-01-17T00:07:50+5:302015-01-17T00:07:50+5:30
येथे पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे

कर्वेनगरमध्ये पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
कर्वेनगर : येथे पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अक्षय मोहन काला (वय १९ वर्षे, रा. स्वामी समर्थ बिल्डिंग, सहवास कॉर्नर, कर्वेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो राहत असलेल्या बिल्डिंग मालकाकडे तो घरकाम करत होता. त्याच बिल्डिंगमध्ये सहा महिन्यांपूर्वी पीडीत मुलीचे कुटुंब राहण्यास आले होते. पीडित मुलगी एकटी पाहून अक्षयने खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. पीडित मुलीचे आई-वडील रोजंदारी करतात. पोलीस उपनिरीक्षक के. एस पुजारी तपास करत आहे. (वार्ताहर)