मेदनकरवाडीत सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: January 26, 2015 01:18 IST2015-01-26T01:18:45+5:302015-01-26T01:18:45+5:30
मेदनकरवाडी (ता. खेड) येथे सव्वादोन लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे

मेदनकरवाडीत सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त
चाकण : मेदनकरवाडी (ता. खेड) येथे सव्वादोन लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यामध्ये विमल गुटख्याच्या ९२५ व सुगंधित तंबाखूच्या १ हजार १२५ पुड्या, तसेच टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप उमाशंकर गुप्ता ( सध्या रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चाकण पोलिसांनी सापळा रचून मेदनकरवाडी येथे टेम्पो पकडला. हा संपूर्ण माल नेमका कुणाचा होता, त्याचा पुरवठा कोणाला होत आहे ? याचा चाकण पोलीस शोध घेत आहेत.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी नीलेश खोले यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न आणि औषध प्रशासनास (एफडीए) विभागाने संबंधित गुटख्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील, महेश मुंढे व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)