सतरा झोपड्या खाक
By Admin | Updated: October 10, 2016 01:42 IST2016-10-10T01:42:59+5:302016-10-10T01:42:59+5:30
शहरातील संजय गांधीनगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत १७ झोपड्या खाक झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली़ ही घटना शॉर्टसर्किटमुळे

सतरा झोपड्या खाक
पिंपरी : शहरातील संजय गांधीनगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत १७ झोपड्या खाक झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली़ ही घटना शॉर्टसर्किटमुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़ सुमारे तासाच्या कामगिरीनंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी संजय गांधीनगर परिसरातील एका झोपडपट्टीतील विजेच्या मीटरला आग लागली. आग लागल्यानंतर काही वेळातच ही आग पसरत गेली़ काही झोपडपट्ट्यांत स्वयंपाकाचे गॅस सुरू असल्यामुळे दोन घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण झोपडपट्टीत आग भडकली. शेजारील नागरिकांनी काही झोपड्यांतील सिलिंडर बाहेर काढून आगीपासून दूर फेकून दिले़ स्थानिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अनर्थ टळला.