पत्नीला पेटवणाऱ्यास ७ वर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: March 18, 2015 00:37 IST2015-03-18T00:37:22+5:302015-03-18T00:37:22+5:30
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या पतीला सत्र न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला ४ हजार रुपयांचा दंडही सुनावला.

पत्नीला पेटवणाऱ्यास ७ वर्षे सक्तमजुरी
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या पतीला सत्र न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला ४ हजार रुपयांचा दंडही सुनावला.
भीमराव जगन्नाथ कोळी (वय ३५, रा. तळेगाव स्टेशन) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या घटनेत लक्ष्मी कोळी (वय २७) यांना पेटवल्याने त्या भाजल्या. त्यांनी तळेगाव दाभाडे ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना २८ आॅक्टोबर २००८ रोजी घडली.
लक्ष्मी आणि भीमराव यांना एक मुलगी आहे. भीमरावला दारूचे व्यसन होेते. लग्नानंतर भीमराव हा लक्ष्मी यांच्यावर चारित्र्यांचा संशय घेत होता. २८ आॅक्टोबरला तो दुपारी घरी दारू पिऊन आला. तो चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला शिवीगाळ करू लागला. त्या वेळी लक्ष्मी यांनी त्याला सणासुदीचे दिवस आहेत, भांडण तंटा करून नका,असे म्हटले. यावरून चिडून त्याने त्याची मुलगी तेजस्विनी हिला उचलून आपटून मारतो, असे म्हणाला. पत्नीने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत त्याने पत्नीला पेटवून दिले. यामध्ये त्या गंभीर भाजल्या.