तरण तलावात सात वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: June 2, 2017 19:32 IST2017-06-02T19:32:27+5:302017-06-02T19:32:40+5:30
बोपाडी येथील जलतरण तलावात बुडून अरहान या सात वर्षाच्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी ११.३० च्या सुसमारास घडली.

तरण तलावात सात वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 02 - बोपाडी येथील जलतरण तलावात बुडून अरहान या सात वर्षाच्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी ११.३० च्या सुसमारास घडली. त्या ठिकाणी नेमणूक केलेल्या जीवरक्षकाने निष्काळजीपणा दाखविल्याने ही दुर्घटना घडली. असा आरोप करून नातेवाईकांनी कारवाईची मागणी केली. त्यामुळे काही काळ बोपोडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अस्लम शेख गुलाम दस्तगीर यांचा सात वर्षाचा मुलगा अरहान अन्य मुलांबरोबर जलतरण तलावावर गेला. त्याला पोहोता येत नव्हते. दस्तगीर यांच्या भावाची मुले रिजवान व फैयाज यांच्याबरोबर अरहान गेला होता. जलतरण तलावावर गेल्यानंतर तेथील महिला रखवालदाराने रिजवान आणि फैयाज यांना पोहोण्यास सोडले नाही. अरहान छोटा असूनही त्याला एकट्याला सोडले. तो पाण्यात उतरला.पोहोता येत नसल्याने पाण्यात बुडाला.तेथील जीवरक्षकांनी तसेच व्यवस्थापकांनी लक्ष दिले नाही. अरहान काठेच दिसत नाही, हे लक्षात येताच रिजवान आणि फैयाज यांनी जलतरण तलावाच्या ठिकाणी असलेल्या रखवालदार, व अन्य कर्मचाºयांकडे विचारपूस केली. अरहान घरी गेला असावा, असे त्यांनी सांगितले. अरहान घरी गेला आहे का ? हे पाहण्यासाठी रिजवान तीन वेळा घरी गेला. तेथे कोठेही अरहान दिसून आला नाही. त्यानंतर निलोफर अस्लम शेख त्या ठिकाणी गेल्या. तेथे त्यांना अरहानची चप्पल दिसली. त्यांनी पाण्यात शोध घेण्यास सांगितले त्यावेळी अरहानचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर संतप्त झालेल्या अरहानच्या नातेवाईकांनी तेथील कर्मचाºयांविरूद्ध कारवाई करावी अशी मागणी केली. काही वेळात तेथे अन्य लोकही जमा झाले. अरहानला जवळच्या रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. अरहानच्या नातेवाइ्कांनी तजलतरण तलावावरील कर्मचा-यांनी निष्काळजीपणा दाखविल्यामुळे दुर्घटना घडली. असा आरोप करून त्यांच्याविरूद्ध फिर्याद दिली.