शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पुण्यातील या सात ठिकाणी मिळणारे चाॅकलेट पान तुम्ही खाल्ले का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 10:30 IST

चहा प्रमाणेच पुणेकर हे पानाचे ही माेठे शाैकिन अाहेत. पुणेकरांच्या अावडीमुळे शहरात अनेक ठिकाणी फक्त पानांची असलेली दुकाने पाहायला मिळतात. अश्याच पुणेकरांमध्ये फेमस असलेल्या सात पान शाॅपला तुम्ही एकदा भेट द्यायला हवी.

पुणे : अापल्या देशात पानाची परंपरा माेठी अाहे, अाणि हाे पान खाणाऱ्यांची सुद्धा. राजे-महाराजेंच्या काळापासून अापल्याकडे पान खाल्ले जाते. प्रत्येक ठिकाणच्या पानाची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. पुण्यातही पान खाणाऱ्या शाैकिनांची संख्याही अधिक अाहे. यात मुलीही मागे नाहीत. पुण्यात विविध ठिकाणी मिळणाऱ्या चाॅकलेट पानाची तरुणांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. तुम्ही जर चाॅकलेट पानाचे चाहते असाल, तर पुढील चार ठिकाणचे चाॅकलेट पान तुम्ही नक्की ट्राय करा. 

शाैकिनपानाच्या वैशिष्ट्याप्रमाणे या दुकानाचे नावही तसेच अाहे. शाैकिनचे पान पुणेकरांमध्ये प्रसिद्ध अाहे. नळस्टाॅपच्या चाैकात शाैकिन पान शाॅपचे दुकान अाहे. शाैकिनने सुरुवातीला चाॅकलेट पान विकण्यास सुरुवात केली. इतर ठिकाणपेक्षा येथील पानाची साईज त्यांनी लहानच ठेवली अाहे. दिसायला साधं मात्र उत्तम असं पान या ठिकाणी तुम्हाला मिळतं. 

चाॅकलेट स्टाेरी अाैंध येथे चाॅकलेटचे विविध पदार्थ मिळत असले तरी येथील चाॅकलेट पान ही खासियत अाहे. या दुकानातील सजावटीप्रमाणेच येथील पान सजवलेले असते. या पान शाॅपमुळे उपनगरात राहणाऱ्या पान शाैकिंनाना एक चांगला कट्टा मिळाला अाहे. 

नाद पान मयूर काॅलनीनावाप्रमाणेच येथील पान तुम्हाला नाद लावल्याशिवाय राहत नाही. येथील सर्वच पान उत्तम असतात. येथे मिळणाऱ्या स्पेशल पानांचे अनेक चाहते अाहेत. येथील पांढरे चाॅकलेट पानही खूप फेमस अाहे. त्यामुळे तुम्ही येथे अजून भेट दिली नसेल तर अाजचं भेट द्या. 

एफसी राेडवरील चाॅकलेट पानतुरुणाईचं हाॅट डेस्टिनेशन असलेल्या एफसी राेडवर मिळणाऱ्या चाॅकलेट पानाची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ अाहे. विकेंडला तर येथे माेठी गर्दी असते. या रस्त्यावर माेठ्या प्रमाणावर हाॅटेल्स असल्याने डिनर नंतर चाॅकलेट पानाचा बेत अनेकांकडून अाखला जाताे. पान अाणि गप्पा असा तर काहींनी राेजचा प्लॅन केलेलाच पाहायला मिळताे. 

राॅयल्टी पान शाॅप प्रभात रस्त्यावर पिटर डाेनटच्या जवळ असलेल्या या पाॅन शाॅपचे चाॅकलेट पान अाणि फुलचंद पान सर्वात फेमस अाहेत. दरराेज संध्याकाळी अाणि रात्री येथे गर्दी असते. याठिकाणी रेग्युलर पान खाण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही अधिक अाहे. 

रुद्र पान शाॅप बंड गार्डन येथे मिळणारे हे पान पूर्व भागातील पुणेकरांच्या अावडीचे अाहे. स्ट्राॅबेरी, चाॅकलेट, पायनॅपल अश्या विविध फ्लेवरचे पान या ठिकाणी तुम्हाला मिळतात. सजवलेलं पान येथील नागरिकांच्या खास पसंतीचे अाहे. चाॅकलेट पानसाठी सुद्धा येथे माेठी गर्दी हाेत असते. 

सिद्धेश्वर पान शाॅपपिंपळे साैदागर येथील नागरिकांमध्ये सिद्धेश्वर पान खूप फेमस अाहे. चाॅकलेट पासून सगळ्याप्रकारचे पान येथे तुम्हाला पाहायला मिळतात. रविवारी येथे माेठी गर्दी असते. त्यातही तरुणांची संख्या अधिक असते.  

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नkothrudकोथरूडAundhऔंध