शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लुने आणखी सात जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 00:22 IST

पुणे शहरातील एकुण मृतांचा आकडा दहावर

पुणे : स्वाईन फ्लूने मागील तेवीस दिवसांत आणखी सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील एकुण मृतांचा आकडा दहावर गेला आहे. तर शनिवारपर्यंत ३१ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. आॅगस्ट महिन्यात स्वाईन फ्लुने तीन महिलांचा बळी घेतला आहे.शहरात आॅगस्ट महिन्यापासून स्वाईन फ्लु बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आॅगस्ट महिन्यापर्यंत स्वाईन फ्लुने एकही रुग्ण दगावला नव्हता. मात्र, आॅगस्ट महिन्यात तीन महिलांना प्राण गमवावे लागले. त्यातील एक महिला उस्मानाबाद येथील तर दोन पुण्यातील होत्या. सप्टेंबर महिन्यातही स्वाईन फ्लुच्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. तसेच या आजाराची तीव्रताही वाढत चालली आहे. दि. २१ आॅगस्ट रोजी स्वाईन फ्लुने तिसरा बळी गेला होता. त्यानंतर शुक्रवार (दि. १४) अखेरपर्यंत आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तेवीस दिवसांतच सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरातील स्वाईन फ्लुचा फैलाव वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ३ हजार ८५२ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९९ रुग्णांना टॅमी फ्लु गोळ््या देण्यात आल्या असून ६ जणांचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. शनिवारी ३ रुग्णांना स्वाईन फ्लु झाल्याचे स्पष्ट झाले. दि. १ जानेवारीपासून आतापर्यंत ६ लाख ३० हजार ४४९ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ७ हजार ३४७ जणांना टॅमी फ्लु गोळ््या देण्यात आल्या. प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आलेल्या १ हजार १६२ नमुन्यांपैकी १७५ जण स्वाईन फ्लुने बाधित होते. आतापर्यंत ६३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूDeathमृत्यूPuneपुणे